जामखेड प्रतिनिधी
मागिल २०१९ च्या निवडणुकीत अनेकजण रोहित पवार यांच्याकडे गेले होते. ते पुन्हा आ. प्रा राम शिंदे यांच्याकडे परतले आहेत. याचे कारण आ. राम शिंदे हेच मान सन्मान व तालुक्याचा विकास करु शकतात. मतदारांनो लक्षात ठेवा, ही लढाई भुमिपुत्र विरुध्द राजपुत्राची आहे. त्यामुळे राम शिंदे याच्या सारख्या भुमिपुत्रालाच येणाऱ्या निवडणुकीत निवडून देऊन विधानसभेत पाठवुन नामदार करा आसे अवहान शेतकरी नेते पाशाभाई पटेल यांनी केले.
कर्जत जामखेड मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार प्रा राम शिंदे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी नरेंद्र पाटील, आमदार प्रा राम शिंदे, प्रा. मधुकर राळेभात, प्रा. सचिन गायवळ, अँड. कैलास शेवाळे, काकासाहेब तापकीर, राजेंद्र गुंड, अंबादास पिसाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, अजय काशिद, संजय काशिद, डॉ. भगवानराव मुरूमकर, सोमनाथ राळेभात, महेश निमोणकर, अमित चिंतामणी, पवन राळेभात, सचिन घुमरे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने, सुनिल साळवे, संतोष गव्हाळे, प्रविण चोरडिया, रवी सुरवसे, मनोज कुलकर्णी, गफ्फार पठाण, शाकीर खान, जमीर बारूद, पोपट (नाना) राळेभात यांच्या सह अनेक मान्यवर नेते व मोठ्या प्रमाणात महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना पाशाभाई पटेल म्हणाले की कर्जत जामखेड ची लढाई भुमीपुत्र विरुद्ध राजपुत्र अशी आहे. गोपीनाथ मुंडे यांनी राम शिंदे यांचे नेतृत्व हेरले होते. शिंदे यांना दिल्लीचा नेता करायचे होते. मागील विधानसभा निवडणुकीत शिंदे यांचा पराभव झाला तरी ते उमेदिने काम करत राहिले याचाच प्रत्यय सभेतील गर्दी वरून दिसून येत आहे. समोरचे उमेदवार ऊस नेणार नाही असे सांगतात पण तुमच्या ऊसाला बांबू लावण्याचे काम कर्जत जामखेडची जनता करणार आहे असे शेतकरी नेते पाशाभाई पटेल यांनी सांगितले.
राम शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे तीन उमेदवार आज राम शिंदे यांचा प्रचार करत आहेत.
पुढच्या निवडणूकीत रोहित पवारही राम शिंदे यांच्या प्रचाराला असतील असेही सांगितले. बारा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस चा अध्यक्ष आज राम शिंदे यांच्या बरोबर आहे. एका मुस्लिम समाजातील व्यक्तीला भाजपाने कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष केले आहे.
जिथे मुसलमान जास्त तिथे काँग्रेस संपली आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तालुक्यात काँग्रेस नेस्तनाबूत करा राम शिंदे हे आजच विजयी झाले आहेत. निकाल बघायची गरज नाही. राम शिंदेच तुमच्या भागातील विकास करू शकतात कारण दिल्लीतील तिजोरीच्या कुलुपाला कमळाची किल्ली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित चिंतामणी यांनी केले. तर रवी सुरवसे, सुनील साळवे, डॉ. भगवानराव मुरूमकर, अँड कैलास शेवाळे, प्रा. मधुकर राळेभात, प्रा सचिन गायवळ, शरद कार्ले यांची भाषणे झाली. काकासाहेब गर्जे, साकतचे माजी सरपंच कांतीलाल वराट सह अनेक गावातील हजारो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.