जामखेड प्रतिनिधी
जामखेडचे भुमीपुत्र आर्मी हवालदार शफीक सय्यद यांनी भारती सैन्य दलातील जम्मू काश्मीर रायफल रेजिमेंट मध्ये शिपाई पासुन ते हवालदार या पदापर्यंत एकुण 22 वर्षे देशसेवा केली. नुकतेच ते 30 जुन 2024 रोजी सैन्य दलातुन सेवानिवृत्त झाले. यावेळी त्यांचा आर्मीचे जम्मू काश्मीर ऑफिसर यांनी सत्कार करुन त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जामखेड येथील भुमीपुत्र शफीक सय्यद हे 2002 साली सैन्य दलातील जम्मु काश्मीर रायफल रेजिमेंट मध्ये भरती झाले होते. त्यांनी अत्तापर्यंन्त जम्मु, काश्मीर, श्रीनगर, गुजरात, आसाम, चेन्नई अशा विविध ठिकाणी एकुण 22 वर्षे सेवा केली. शिपाई पदापासून ते हवालदार पदापर्यंत सेवा संपल्यानंतर ते नुकतेच 30 जुन 2024 रोजी या सैन्य दलातुन सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचा आर्मीचे जम्मू काश्मीर ऑफिसर यांनी सत्कार केला व निरोप देण्यात आला.