विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमांतून जामखेड बाजार समितीत उभारणार दिड कोटींचे “शेतकरी भवन”

- Advertisement -spot_img

सभापती शरद कार्ले व संचालक मंडळाच्या पाठपुराव्याला मोठे यश; शासनाच्या निर्णयाचे तालक्यातील शेतकऱ्यांकडून स्वागत

जामखेड तालुक्याचे भुमीपुत्र विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमांतून जामखेड बाजार समितीत शेतकरी व व्यापारी बांधवांना सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच अग्रेसर असलेले कर्तव्यदक्ष सभापती पै. शरद कार्ले व सर्व संचालक मंडळाने सभापती प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमांतून केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले असून त्यानुसार महाराष्ट्र शासनाने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या ठिकाणी शेतकरी बांधवांना मुक्कामाची सोय व्हावी तसेच शेतकऱ्यांच्या मूलभूत सुविधा देखील त्याच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सुरू केलेल्या “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन” या योजनेंतर्गत जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत येथे नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी रु.१,४६,७५,६८४ (एक कोटी सेहेचाळीस लक्ष पंच्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याऐंशी) एवढ्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले यांनी दिली आहे.आहे.


राज्याच्या सहकार, पणन व वस्रोद्योग विभागाने आज दि. २२ एप्रिल रोजीच सदर मान्यतेचे परिपत्रक जारी केले.
राज्याच्या विधान परिषदचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमांतून कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी अनेक विकास कामे होत आहेत. प्रा. शिंदे यांच्या माध्यमांतून सर्व स्तरातील नागरिकांचा विकास होत असताना शेतकरी तरी कसे मागे राहतील. त्याच अनुषंगाने जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत पै. शरद कार्ले यांच्या नेतृत्वाखाली व सर्व संचालक मंडळाच्या सहकार्यने विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमांतून अनेक विकास कामे तसेच शेतकरी व व्यापारी यांच्यासाठी विविध सोईसुविधांची निर्माण केल्या जात आहेत.


जामखेड तालुक्याचे भुमीपुत्र विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमांतून जामखेड बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले व सर्व संचालक मंडळाने सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या माध्यमांतून केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले असून त्यानुसार महाराष्ट्र शासनाने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या ठिकाणी शेतकरी बांधवांना मुक्कामाची सोय व्हावी तसेच शेतकऱ्यांच्या मूलभूत सुविधा देखील त्याच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सुरू केलेल्या “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन” या योजनेंतर्गत जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत येथे नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी रु.१,४६,७५,६८४ (एक कोटी सेहेचाळीस लक्ष पंच्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याऐंशी) एवढ्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले यांनी दिली आहे
यामुळे बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले, सर्व संचालक, जामखेड तालुक्यातील सर्व शेतकरी व बाजार समितीतील सर्व व्यापारी यांनी आनंद व्यक्त करत या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच राज्य सरकार व विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे साहेब यांचे आभार मानले आहेत.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा