खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ची मागणी
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फाउंडेशन संचलित सर्व वैद्यकीय कॉलेजे मान्यता रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना इतर कॉलेज मध्ये स्थलांतरित करण्यासाठीच्या प्रक्रिया आढावा बैठक जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या अध्यक्षते खालील संपन्न झाली. विषेश म्हणजे
हा खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फाउंडेशन संचलित सर्व वैद्यकीय शाखांची मान्यता रद्द करण्याची व विद्यार्थ्यांची स्थलांतर प्रक्रिया आढावा बैठक आज दि २२ मे रोजी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या दालनात संपन्न झाली. या वेळी सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ, आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ लोणेरे रायगड, यांचे प्रतिनिधी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, जामखेड चे तहसिलदार गणेश माळी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका अध्यक्ष पांडुराजे भोसले, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत, मनसे चे जामखेड तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, सकल मराठा समाजाचे केदार रसाळ, ॲड अमोल जगताप, गणेश जोशी उपस्थीत होते.
या वेळी सर्व वैद्यकीय शाखांच्या मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया कोणत्या टप्यावर आहे, सर्व वैद्यकीय शाखांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा नियोजन कसे केलें आहे. याची सविस्तर माहिती सर्व विद्यापीठांनी दिली , त्या मध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या सर्व वैद्यकीय शाखांच्या मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया पुर्ण झाली असून नवीन वर्षाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होण्या अगोदर सर्व विद्यार्थी इतर कॉलेज मध्ये स्थलांतरित होऊन कॉलेज पूर्ण पणे बंद करण्यात येईल असे सांगितले,
बाकी सर्व वैद्यकीय शाखांच्या मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल असे सर्व प्रतिनिधींनी सांगितले . रत्नदीप मेडिकल कॉलेज चा सर्व कारभार किती अंदाधुंद होता याचे वर्णन चौकशी समितीने जिल्हाधिकारी यांच्या समोर केले तेव्हा खुद्द जिल्हाधिकारी अवाक झाले तेव्हा त्यांनी ” हा तर एखादा सिनेमा तयार होईल अशी प्रतिक्रिया दिली”
एवढा बोगस कारभार असणाऱ्या ठिकाणी सात कॉलेज ला मान्यता कोणी दिली असा प्रश्न उपस्थित करुन ज्या कमिटीने डोळे मिटून याला मान्यता दिली त्यांची देखील चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना बैठकीला संबोधित करताना दिल्या.
या वेळी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संभाजी बिग्रेड सकल मराठा समाज महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी धर्मादाय आयुक्तांकडून या संस्थेची नोंदणी रद्द करण्याची मागणी केली त्या वर लगेच तत्काळ प्रक्रिया राबविण्याच्या सूचना दिल्या.
भास्कर मोरे याच्या वर गुन्हा दाखल होऊन पोलीसांनी तपास पुर्ण करून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले आहे, हा खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली त्याचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी स्विकारले.