हजारोंच्या उपस्थित भरला आ. रोहित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज
जामखेड प्रतिनिधी
कर्जत जामखेडची जनता खुप भाग्यवान आहे कारण रोहित पवारांसारखा विकासाचे व्हिजन असणारा आमदार तुम्हाला मिळाला आहे रोहित पवार हे आता महाराष्ट्राचे नेते आहेत त्यांनी त्यांचे कर्तृत्व विकासातून सिद्ध केले आहे. भुमीपुत्र हा जन्माने नाही तर कर्तृत्वाने मोठा होतो आसे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
कर्जत जामखेडचे कार्यसम्राट आ. रोहित पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते. यावेळी सायंकाळी कर्जत-जामखेड मतदारसंघ महाविजयी संकल्प सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी खासदार डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी काँग्रेसचे नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार निलेश लंके, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड, आ. रोहित पवार, माजी आ. नारायण पाटील, राजेंद्र देशमुख, दत्ता वारे, नामदेव राऊत, जामखेड शिवसेना तालुका प्रमुख ॲड. मयूर डोके, कर्जत तालुका प्रमुख बळीराम यादव, विजयसिंह गोलेकर, अमोल राळेभात, राजेंद्र कोठारी, संजय वराट, हनुमंत पाटील, सुभाष गुळवे, सुर्यकांत मोरे, शामभाऊ कानगुडे, किरण पाटील, बाळासाहेब साळुंखे, राजेंद्र फाळके, सचिन खरात विजयसिंह गोलेकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ही रॅली आ. रोहित पवार यांना विजयाची साथ देणारी रॅली आहे. तुम्ही खुप नशिबवान आहेत रोहित पवार यांच्या सारखा आमदार तुम्हाला लाभला आहे. जीथं राम आहे तिथे कमळ फुलत नाही आसा टोला देखील आमोल कोल्हे यांनी आ. राम शिंदे यांचे नाव न घेता लावला. फडवणीसांना एकच भीती आहे की आ. रोहित पवारांना लिड कीती त्यामुळे लोकसभेचा बारामतीचा रेकॉर्ड तोडुन या विधानसभेला रोहीत पवार यांना निवडुन द्या? बच्चा आता बच्चा नाही तो सच्चा आहे. महाराष्ट्रातील रोजगार गुजरातला पाठवले आणि महाराष्ट्रातील तरुण बेरोजगार राहीला आशी टीका देखील आमोल कोल्हे यांनी केली.