तहसील कार्यालयास दिले मागणीचे निवेदन

जामखेड प्रतिनिधी
सध्या कडक उन्हामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट पसरलेली दिसत आहे. ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.जामखेड तालुक्यातील डोणगाव गावात ग्रामस्थ मोठय़ा प्रमाणावर पाणी टंचाईला सामोरे जात आहेत.

गावातील लोकांचे तसेच जनावरांचेही पाण्यासाठी फार हाल होत आहेत. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी टॅकर चालू करण्याची मागणी रिपब्लिकन आँफ इंडीया कामगार आघाडी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष खंडुजी मोरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

तहसील कार्यालयाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की डोणगाव ग्रामस्थांनी गावात पाण्याचे टँकर चालू करण्यासाठी दि १७एप्रिल रोजी अर्ज प्रस्ताव दिला आहे त्यानुसार ग्रामसेवक यांनी २१ एप्रिल रोजी आँनलाईन दाखल केला आहे.

गावात कोणत्याही प्रकारचा पाण्याचा श्रोते उपलब्ध नाही. तरीही अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून हाल सहन करावा लागत आहे. या गंभीर बाबींचे दखल घेऊन आठ दिवसांत टँकर चालू न झाल्यास तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे खंडुजी मोरे यांनी निवेदनात म्हटले आहे.
