कर्जत जामखेड मतदारसंघात आ. रोहित पवार यांचाच करिश्मा.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर नगर दक्षिणेत महायुतीकडून मा.खा.सुजय विखे पाटील तर महाविकास आघाडीकडून खा. निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली भाजपमधील नाराज गट यांनी प्रथम विखेंच्या उमेदवारीला विरोध केला होता परंतु पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मध्यस्थी करत पक्षांतर्गत वाद मिटला आसे सांगण्यात आले परंतु खरोखरच मनोमिलन झाले होते का हे आता आकडेवारीनुसार दिसुन येते.
कर्जत जामखेड मतदारसंघातुन खा. निलेश लंके यांना नऊ हजारांच्यावरती लीड मिळाले आहे यावरूनच या मतदारसंघात आ. रोहित पवार यांचाच करिश्मा दिसुन येतो आहे यापुर्वी भाजपचा बालेकिल्ला आसलेला मतदारसंघ विधानसभा व आता लोकसभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला पसंती देताना या आकडेवारीवरून दिसुन येत आहे
गावनिहाय दोन्ही उमेदवारांना मिळालेली मते.
महाराष्ट्रातील हाय होल्टेज मतदारसंघ म्हणून नगर लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. महायुतीकडून डॉ. सुजय विखे तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके उमेदवार होते. मतमोजणी वेळी कधी विखे तर कधी लंके मताधिक्य कमी जास्त होत होते. एकुण मतदान 1325477 (तेरा लाख पंचवीस हजार चारशे सत्याहत्तर) झाले होते. एकुण पंचवीस व नोटा एक असे 26 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यात 28929 मताधिक्य घेत निलेश लंके विजयी झाले आहेत.
कर्जत जामखेड, श्रीगोंदे व पारनेर विधानसभा मतदारसंघात निलेश लंके यांनी आघाडी घेतली तर अहमदनगर शहर, शेवगाव पाथर्डी व राहुरी विधानसभा मतदारसंघात डॉ. सुजय विखे पाटील आघाडीवर होते. पारनेर, श्रीगोंदा व कर्जत जामखेड ने निलेश लंके यांना साथ दिली तर अहमदनगर शहर, राहुरी व शेवगाव पाथर्डी या तालुक्यानी विखेला साथ दिली.
निलेश लंके यांच्या पारनेर मतदारसंघात लंके यांना 130440 तर विखे यांना 92340 मते मिळाली यात लंके यांनी 38100 मताधिक्य घेतले श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात निलेश लंके यांना 118936 मते तर सुजय विखे यांना 86259 मते मिळाली यात लंके यांनी 32711 मतांची आघाडी घेतली. कर्जत जामखेड मतदारसंघात निलेश लंके यांना 104936 मते तर सुजय विखे यांना 95835 मते मिळाली यात लंके यांनी 9128 मतांची आघाडी घेतली.
डॉ सुजय विखे यांना नगर शहर, राहुरी व शेवगाव पाथर्डी मधुन मताधिक्य
नगर शहरात डॉ सुजय विखे यांना 105859 मते तर निलेश लंके यांना 74263 मते मिळाली यात विखे यांना 31596 मातांची आघाडी मिळाली.
राहुरी विधानसभा मतदारसंघात डॉ सुजय विखे यांना 106903 मते मिळाली तर निलेश लंके यांना 94967 मते मिळाली यात विखे यांना 11936 मतांची आघाडी मिळाली.
शेवगाव पाथर्डी मतदारसंघात डॉ सुजय विखे यांना 106992 मते तर निलेश लंके यांना 98551 मते मिळाली यात 8441 मतांची आघाडी विखे यांना मिळाली.
निलेश लंके यांना एकुण 624797 मते मिळाली तर डॉ सुजय विखे यांना 595868 मते मिळाली यात निलेश लंके यांना 28929 मतांची आघाडी घेत निलेश लंके यांनी विजय संपादन केला.
निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार होते. परंतु निवडणुकीपूर्वी ते शरद पवार गटात दाखल झाले. त्यानंतर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी त्यांना उमेदवारी दिली. एक खासदार तीन आमदारांसह अहमदनगर मतदार संघावर भाजपचे प्राबल्य होते. अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा, कर्जत- जामखेड मतदार संघ आहेत.