ज्ञानराधा पतसंस्थेतील ठेवी मिळत नाहीत या मानसिक धक्क्यातून सहा महिन्यात जामखेड तालुक्यात पाच जणांचा मृत्यू

- Advertisement -spot_img

शनिवारच्या मोर्चा व रास्ता रोको साठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – रमेश आजबे

ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेच्या जामखेड शाखेत तालुक्यातील गोरगरीब, ऊसतोड मजुरी करणारे, सेवानिवृत्त कर्मचारी यांनी पोटाला चिमटा देऊन पै पै करून  आपल्या ठेवी पतसंस्थेत ठेवल्या आहेत. सहा महिन्यांपासून बँक बंद आहेत. यामुळे ठेवीदार चिंतेत आहेत. अनेक ठेवीदारांच्या मुलांमुलींची लग्ने रखडली आहेत. अनेकांना आजारपणात उपचारासाठी पैसे नाहीत. मुलामुलींची शिक्षण थांबले आहेत. यामुळे ठेवीदार चिंतेत आहेत. आतापर्यंत तालुक्यातील पाच जणांनी मानसिक धक्क्यातून पाच जण दगावले आहेत त्यांच्या कुटुंबियांना व ठेवीदारांना न्याय देण्यासाठी शनिवारी भव्य मोर्चा व रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे तरी ठेवीदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी केले आहे.

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे म्हणाले की, ज्या लोकांच्या ठेवी ज्ञानराधा पतसंस्थेत अडकल्या आहेत त्यांनी आपल्या नाव गाव किती रक्कम आहे तसेच मोबाईल क्रमांक टाकून एक अर्ज द्यावा तसेच शनिवारच्या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. बीड रोडवरील ज्ञानराधा पतसंस्थेसमोर सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी केले आहे. 

तसेच दोन दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन जामखेड पोलीस स्टेशनला दाखल झालेला गुन्हा वर्ग करण्याची विनंती केली तेव्हा पोलीस अधीक्षक यांनी लवकरच गुन्हा स्वत कडे घेऊन योग्य चौकशी करू असे सांगितले.

ज्ञानराधा पतसंस्थेवर लवकरच प्रशासक नेमून बँकेचे कर्ज, ठेवी, बँकेची मालमत्ता याचा ताळमेळ घालून ठेवीदारांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा असेही आजबे यांनी सांगितले. यावेळी ठेवीदार डॉ प्रदीप कात्रजकर यांनी सांगितले की, आम्ही दोन महिन्यांपूर्वी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे त्याचे अद्याप काहीच झालेले नाही. यामुळे येत्या शनिवारी मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे सांगितले.

बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टे को-ऑप सोसायटीकडे कर्जत-जामखेड तालुक्यातील सुमारे साडेसहा हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या ९० कोटी रुपयांहून अधिक ठेवी आहेत. परंतु या संस्थेकडून या ठेवीदारांची फसवणूक झाली आहे. या संस्थेची चौकशी करुन कारवाई करावी आणि कर्जत- जामखेड मतदारसंघातील ठेवीदारांसह सर्वच ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत यासाठीही आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती त्यामुळे ठेवीदारांमध्ये न्याय मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली होती.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर मोलमजुरी करण्याची वेळ

मुलांमुलींच्या उच्च शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी विश्वासाने अनेकांनी सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा पतसंस्थेत आपल्या आयुष्याची पुंजी ठेवली, स्वतः च्या पोटाला चिमटा घेऊन, मोलमजुरी करून, सेवानिवृत्ती नंतर उर्वरित आयुष्य व्याजाच्या पैशावर गुजरान करावी म्हणून जामखेड परिसरातील ठेवीदारांनी ज्ञानराधा को – आँप क्रेडीट सोसायटी जामखेड शाखेत जामखेड व परिसरातील ६५०० ठेवीदारांचे ९० कोटी रुपये रूपये ठेव आहेत. त्या लवकरात लवकर मिळाव्यात अशी मागणी आहे. यामुळे शनिवारच्या मोर्चा व रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रमेश आजबे यांनी केले आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा