शंभर टक्के मतदान लोकशाहीची शान जामखेड मध्ये घुमला आवाज

- Advertisement -spot_img

मतदान जनजागृती रॅली श्री नागेश विद्यालय वतीने संपन्न

जामखेड प्रतिनिधी

शंभर टक्के मतदान करण्याचे विद्यार्थ्यांनी केले आव्हान.

जामखेड चे तहसीलदार गणेश माळी, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, केंद्रप्रमुख नवनाथ बडे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड मध्ये रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय संकुलात  मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.


       यावेळी मतदान जनजागृती प्रतिज्ञा घेण्यात आली तसेच.
मतदान जागृती रॅलीचे उद्घाटन  प्राचार्य मडके बी के यांच्या हस्ते करण्यात आले.
      यावेळी प्रमुख उपस्थिती प्राचार्य मडके बी के पर्यवेक्षक कोकाटे व्ही के,   पर्यवेक्षक संजय हजारे, एनसीसी ऑफिसर मयूर भोसले, साईप्रसाद लोखंडे ,अशोक सांगळे, संतोष सरसमकर, एस एस गुट्टे, जाधव सर, पठाण सर आदी मान्यवर उपस्थित होते.


      जामखेड शहरातून एनसीसी विद्यार्थी रॅली द्वारे मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो,  माझे मत माझा अधिकार, शंभर टक्के मतदान लोकशाहीची शान, अशा घोषणेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला
          या रॅलीमध्ये नागेश विद्यालय ,कन्या विद्यालय व 17 महाराष्ट्र बटालियन एनसीसी  नागेश विद्यालयांचे एनसीसी कॅडेट व शिक्षक सहभागी झाले.
       शंभर टक्के मतदान सर्वांनी करावे असे आव्हान या रॅलीतून  करण्यात आले.
      यावेळी प्राचार्य मडके यांनी मनोगतात विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना सांगून मतदान करण्याचे आव्हान करावे व लोकशाहीला बळकट करावे असे मनोगत व्यक्त केले.
          या उपक्रमाचे तहसीलदार गणेश माळी यांनी कौतुक केले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा