कर्जत व जामखेड तालुक्यातील ६ रस्त्यांच्या कामांसाठी ६० लाख रूपयांचा निधी मंजूर – आमदार प्रा. राम शिंदे

- Advertisement -spot_img

जामखेड : कर्जत व जामखेड तालुक्यातील ६ रस्त्यांच्या कामांसाठी ग्रामविकास विभागाकडून ६० लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांना सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे, अशी माहिती आमदार प्रा राम शिंदे यांनी दिली.

कर्जत – जामखेड मतदारसंघात रस्त्यांचे जाळे मजबुत करण्यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी आजवर कोट्यावधी रूपयांचा निधी मंजुर करून आणला आहे. मतदारसंघातील काही रस्ते खराब झाले होते. या रस्त्यांची सुधारणा व्हावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व भाजपा कार्यकर्त्यांनी आमदार शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांनी सरकारकडे पाठपुरावा हाती घेतला होता.

ग्रामविकास विभागाने कर्जत तालुक्यातील ५  व जामखेड तालुक्यातील एक अश्या ६ रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देत ६० लाखांचा निधी मंजुर केला आहे. सन २०२४ – २०२५ आर्थिक वर्षासाठी ३०५४ २४१९ या लेखाशिर्षाखाली रस्ते व पूल परिक्षण कार्यक्रम अंतर्गत गट ब मधून प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे, याबाबतचा शासन निर्णय ग्रामविकास विभागाने जारी केला आहे.

ग्रामविकास विभागाने कर्जत तालुक्यातील मुसलमानवस्ती दुरगाव केदळेवस्ती रस्ता, दगडवाडी ओमानवाडी ते कौडाणे ते ग्रा. मा ७, रामा ६७ जलालपुर ते पवारवस्ती नंबर दोन, प्रजिमा ५४ ते भिसे वस्ती (जवळकेवाडी), रामा ६८ ते जांभूळकरवस्ती, तर जामखेड तालुक्यातील रामा ५६ ते हनुमान वस्ती रस्ता या ६ कामांना प्रत्येकी १० लाख रूपये असा ६० लाख रूपयांचा निधी मंजुर केला आहे. या निधीतून रस्ता सुधारण्याची कामे होणार आहेत.

खराब रस्त्यांमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांची या त्रासातून सुटका करण्यासाठी आमदार शिंदे यांनी सदर रस्त्यांची कामे मार्गी लावण्यात यश मिळवले आहे. आमदार शिंदे यांच्या पाठपुराव्यातून महायुती सरकारने ६० लाखांचा निधी मंजुर केला आहे.रस्ते सुधारण्याची कामे मार्गी लागणार असल्यामुळे जनतेत आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान, महायुती सरकारने रस्ते सुधारणा कामांसाठी ६० लाखांचा निधी मंजुर केल्याबद्दल जनतेतून सरकारचे आभार मानले जात आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा