जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकार बंधुनी व अधिकारी मित्रमंडळी यांनी केले अभिनंदन !!
जामखेड प्रतिनिधी –
श्री साकेश्वर विद्यालयातील शिक्षक सुदाम वराट यांची दि. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या पगारदार नोकरांची सहकारी पतसंस्थेच्या स्विकृत संचालक पदी निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
सुदाम वराट यांना स्विकृत संचालक म्हणून पत्र देताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, माजी चेअरमन व श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रमेश अडसुळ, चेअरमन डॉ. सुनील नरके, सेक्रेटरी भरत रामभाऊ, तंज्ञ संचालक पांडुरंग वराट, राजकुमार थोरवे, दत्तात्रय राजमाने, लिपीक दत्ता वीर उपस्थित होते.परिसरात एक नामांकित पतसंस्था म्हणून दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या पगारदार नोकरांची सहकारी पतसंस्थेकडे पाहिले जाते या पतसंस्थेचे एकुण भागभांडवल 19 कोटी रुपये आहे. तर कर्जवाटप 10 कोटी पन्नास लाख रुपये आहे. पतसंस्थेत एकुण सात कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे संचालक मंडळ पुढीलप्रमाणे आहे.चेअरमन सुनील नरके, व्हाईस चेअरमन उमाकांत कुलकर्णी, सेक्रेटरी भरत रामभाऊ, खजिनदार बा. द. धनवडे, संचालक अनिल देडे, अर्जुन रासकर, दिपक सुरवसे, हनुमंत वराट, ज. स. सरडे, दि. सु. डोंगरे, तंज्ञ संचालक पांडुरंग वराट, निमंत्रित संचालक बाळासाहेब पारखे, अनिल काळे असे संचालक मंडळ आहे.सुदाम वराट यांनी या आगोदरही पाच वर्षे संचालक म्हणून कामकाज पाहिलेले आहे. त्यांची स्विकृत संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकार व अधिकारी तसेच मित्रमंडळी यांनी अभिनंदन केले आहे.