कर्जत जामखेड मतदारसंघातील कार्यकर्तेंचा मी नेहमी आदरच केला आहे, भुमीपुत्राला साथ द्या – आमदार प्रा. राम शिंदे

- Advertisement -spot_img

सोनेगाव मध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जामखेड प्रतिनिधी

दोन वर्षांपूर्वी मी विधानपरिषदेचा आमदार झालो व राज्यात सत्तांतर होऊन महायुतीचे सरकार आल्यानंतर मी जामखेड तालुक्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध केला तसेच नेहमीच कार्यकर्त्यांचा आदरच केला आहे, म्हणून 2019 साली आलेले हे परकीय आक्रमण जामखेड तालुक्यातील भूमिपुत्र जनता परत पाठवण्यासाठी सज्ज झाली असल्याचे प्रतिपादन आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केले.


ते सोनेगाव येथील प्रचार सभेत बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ नेते प्रा.मधुकर राळेभात, प्रा. सचिन गायवळ, डॉ.भगवान मुरूमकर, रवी सुरवसे, वैजिनाथ पाटील, महेश निमोणकर, दिगंबर चव्हाण, सरपंच डॉ. विशाल वायकर, संतोष गव्हाळे, प्रवीण पोते यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.


आमदार शिंदे बोलताना पुढे म्हणाले की, सत्ता असो किंवा नसो मी कधीही सत्तेचा माज केला नाही तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांचा नेहमी आदरच केला आहे, माझ्या काळात ठीक ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेतून अनेक गावे पाणीदार केले आहेत. या भागातील रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजना, आरोग्य केंद्रासाठी सहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून प्रत्यक्षात आरोग्यसेवा सुरू ठेवली आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे बहिणीच्या खात्यात जमा झाले आहेत व ही योजना पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर मोठ्या ताकतीने सुरू ठेवणार आहे. आपला तो आपलाच समजून आपल्या भूमिपुत्राला पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीत निवडून द्या असे आवाहन शेवटी आमदार राम शिंदे यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.
यावेळी सोनेगावचे भूमिपुत्र प्रा. सचिन गायवळ यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करीत परिसरातील पिंपळगाव उंडा, पिंपळगाव आळवा, वंजारवाडी, धनेगाव, तरडगाव, पोतेवाडी, सातेफळ, दिघोळ, जातेगाव इत्यादी गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार राम शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
याप्रसंगी विशाल कांबळे, विलास मिसाळ, महेश काळे, डॉ. जयराम खोत, नंदू आबा गोरे, महेश दिंडोरे, अश्रू खुपसे, गणेश लटके, इत्यादी सह बहुसंख्य नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार अभिमन्यू मिसाळ यांनी मानले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा