संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला:कॅप्टन लक्ष्मण भोरे
जामखेड प्रतिनिधी
आज दि. २६ जानेवारी रोजी जामखेड शहरातील शिवनेरी अकॅडमी या ठिकाणी सकाळी आठ वाजता बाफना उद्योग समूहाचे संचालक उद्योजक अकाश बाफना यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रमुख मान्यवरांचे स्वागत संचालक भोरे व येथेल प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी कवायत करत केले

यावेळी त्रिदल आजी-माजी सैनिकांची उपस्थितीत होती.
शिवनेरी अकॅडमीत वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते
सर्व महापुरुषांची जयंती तसेच सैनिक भरतीसाठी प्रशिक्षण सामाजिक उपक्रम शौर्यदिन कारगिल विजयदिन याच बरोबर गरीब विद्यार्थ्यांना कमवा व शिका असे उपक्रम राबविण्यात येतात

आज ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी बोलताना अदर्श फौंडेशनचे अध्यक्ष अकाश म्हणाले की
जामखेड सारख्या ग्रामीण भागात शिवनेरी अकॅडमी स्थापन करून देशाच्या रक्षणासाठी सशक्त युवक येथे घडत आहे देशभक्ती व सामाजिक बांधिलकीचे प्रेरणा युवकांच्या मध्ये रूजवत आहे देश कार्य व सुसंस्कृत समाज घडवणारी अकॅडमी आसल्याने ही जामखेडकरांसठी आभिमानस्पद आसल्याचे त्यांनी सांगितले
तसेच अकॅडमीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे बोलताना म्हणाले की
भारताच्या इतिहासात प्रजासत्ताक दिन हा सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे
घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ जानेवारी १९५० साली देशाला संविधान आमलात आणुन सर्वांना जगण्याचा रहाण्याचा व्यक होण्याचा अधिकार दिला त्यामुळेच आज प्रजासत्ताक दिन सर्वत्र मोठ्या आनंदाने साजरा होत आहे.
यावेळी शिवनेरी अकॅडमीचे कॅप्टन लक्ष्मण भोरे,अदर्श फौंडेशनचे अध्यक्ष अकाश बाफना सैनिक त्रिदल संघटनेचे उपाध्यक्ष कांतीलाल कवादे, आयर्न मँन डॉ. पांडुरंग सानप, नामदेव राळेभात, बापू राख, पिंपळे सर यांच्या सह मोठ्या प्रमाणावर आजी माजी सैनिक, अकॅडमी भरतीपुर्व प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.