कर्जत-जामखेड मतदारसंघातील 25 रस्त्यांसाठी 93 कोटींचा निधी मंजुर

- Advertisement -spot_img

आमदार प्रा.राम शिंदे यांनी खेचून आणला भरीव निधी

जामखेड : कर्जत व जामखेड या दोन तालुक्यातील रस्त्यांची कामे मार्गी लागावीत यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांचा सातत्याने सरकारकडे पाठपुरावा सुरु असतो. या पाठपुराव्याला आणखीन एक मोठे यश मिळाले आहे. महायुती सरकारने अर्थसंकल्पीय (पावसाळी) अधिवेशनात रस्त्यांच्या कामांसाठी 93 कोटी 55 लाख रूपयांच्या भरीव निधीस मंजुरी दिली आहे. आमदार प्रा. राम शिंदे यांनी रस्त्यांच्या कामासाठी भरिव निधी खेचून आणल्यामुळे मतदारसंघातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कर्जत – जामखेड मतदारसंघात दळणवळणाच्या सुविधा अधिक गतीमान व्हाव्यात यासाठी आमदार प्रा राम शिंदे हे नेहमीच आग्रही राहिले आहेत. ‘गाव तिथे रस्ता, वाडी तिथे रस्ता’ व्हावा,  यासाठी आमदार शिंदे हे सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करत असतात. आजवर त्यांनी रस्त्यांच्या कामांसाठी करोडो रूपयांचा निधी खेचून आणला आहे. त्यामुळे मतदारसंघात रस्त्यांचे मजबुत जाळे निर्माण झाले आहे. मतदारसंघातील काही भागातील रस्त्यांचे प्रश्न प्रलंबित होते. त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आमदार शिंदे यांचा सरकारकडे पाठपुरावा सुरु होता. अखेर या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. अर्थसंकल्पीय पावसाळी अधिवेशनात सरकारने कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी तब्बल 93 कोटी 55 लाख रूपयांचा भरघोस निधी मंजुर केला आहे

कर्जत-जामखेड मतदारसंघातील 25 रस्त्यांसाठी 93 कोटी 55 लाख रूपयांच्या भरीव निधीस महायुती सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. यामध्ये जामखेड तालुक्यातील 8 रस्त्यांसाठी 07 कोटी 20 लाख तर कर्जत तालुक्यातील 17 रस्त्यांसाठी 86 कोटी 35 लाख रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. अर्थसंकल्पीय पावसाळी अधिवेशनातून आमदार शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे. आमदार शिंदे यांच्या विकासात्मक धोरणामुळे मतदारसंघातील रस्त्यांमध्ये सातत्याने अमूलाग्र बदल झाल्याचे दिसत आहे. रस्त्यांची अनेक कामे झाली असून काही कामे सुरु आहेत. तर काही कामांचा पाठपुरावा सुरु असून लवकरच याही कामांना मंजुरी मिळून रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागणार आहेत.

अर्थसंकल्पीय पावसाळी अधिवेशनात ज्या रस्त्यांची कामे मंजुर झाली आहेत, त्या कामांना निधी द्यावी अशी मागणी या भागातील जनतेकडून सातत्याने होत होती, या मागणीची दखल घेऊन आमदार प्रा.राम शिंदे यांनी सरकारकडे जोरदार पाठपुरावा करत निधी मंजुर करून आणला आहे. महायुती सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात रस्त्यांच्या कामांसाठी 93 कोटींचा निधी मंजुर केला आहे. या निधीतून ग्रामीण भागातील दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा निर्माण होणार आहेत. मजबुत व पक्क्या रस्त्यांच्या निर्माणामुळे अपघाताच्या घटना रोखल्या जाणार आहेत. यामुळे जनतेकडून आमदार प्रा राम शिंदे व महायुती सरकारचे आभार मानले जात आहे.

चौकट

“रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागल्यास स्थानिक व्यापारी, विद्यार्था, शेतकरी, व्यावसायिकांसह स्थानिक बाजारपेठेला याचा मोठा फायदा होतो, त्यामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघात रस्त्यांचे मजबुत जाळे निर्माण व्हावे यासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. मतदारसंघातील प्रत्येक गाव पक्क्या रस्त्याने जोडले जावे यासाठी आजवर करोडो रूपयांचा निधी खेचून आणला आहे. अजूनही अनेक महत्वाची कामे मार्गी लावायची आहेत त्यासाठी माझा सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. सरकारने अर्थसंकल्पीय पावसाळी अधिवेशनात मतदारसंघातील 25 रस्त्यांसाठी 93 कोटी 55 लाख रूपयांचा भरघोस निधी मंजुर केला आहे. हा निधी मंजुर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व महायुती सरकारचे मनापासून आभार”

*- आमदार प्रा राम शिंदे (माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य)*

*कर्जत तालुक्यातील मंजुर रस्ते खालील प्रमाणे*

१) कोरेगांव ते रामा-६७ अळसुंदे बेनवडी थेरवडी दुरगांव कुळधरण रस्ता इजिमा- १४६ कि.मी. १२/०० ते २२/०० मध्ये सुधारणा करणे ता. कर्जत जि. अहमदनगर

२) राक्षसवाडी बु. ते सोलनकरवस्ती रस्ता ग्रामा-२६५ कि.मी. ०/०० ते ४/०० मध्ये सुधारणा करणे ता. कर्जत जि. अहमदनगर

३) गणेशवाडी ते माळवाडी रस्ता ग्रामा-२८ कि.मी. ०/०० ते ३/५०० मध्ये सुधारणा करणे ता. कर्जत जि. अहमदनगर

४) इजिमा-१४८ ते करपडी रस्ता ग्रामा-२०१ कि.मी. ०/५०० ते ०/९०० मध्ये सुधारणा करणे ता. कर्जत जि. अहमदनगर

५) ) दुरगांव ते सोनाळवाडी रस्ता ग्रामा-१९ कि.मी. ०/०० ते ७/०० मध्ये सुधारणा करणे ता. कर्जत जि. अहमदनगर

६) इजिमा-१४८ ते कावळवाडी जिल्हा हद्द रस्ता ग्रामा-७५ कि.मी. ०/०० ते ४/०० मध्ये सुधारणा करणे ता. कर्जत जि. अहमदनगर

७) राशिन काळेवाडी ते सावडी जिल्हा हद्द रस्ता इजिमा-३१० कि.मी. ८/५०० ते ९/५०० मध्ये सुधारणा करणे ता. कर्जत जि. अहमदनगर

८) राशिन इजिमा-३१० वेताळवस्ती गाडेवाडी ते सावडी जिल्हा हद्द रस्ता ग्रामा-१२२ कि.मी. ०/००० ते ५/०० मध्ये सुधारणा करणे ता. कर्जत जि. अहमदनगर

९) इजिमा-१४८ ते करपडी रस्ता ग्रामा-२०१ कि.मी. ०/५०० ते १/०० मध्ये सुधारणा करणे ता. कर्जत जि. अहमदनगर

१०) निमगांव डाकु निमबोडी सितपुर मिरजगांव चांदे बु. बिटकेवाडी शिंदे कोपर्डी रस्ता प्रजिमा-२०५ कि.मी. ४८/१४० ते ५६/२७० मध्ये सुधारणा करणे ता. कर्जत जि. अहमदनगर

११) कोरेगांव ते रामा-६७ अळसुंदे बेनवडी थेरवडी दुरगांव कुळधरण रस्ता इजिमा- १४६ कि.मी. ०/०० ते ३/०० मध्ये सुधारणा करणे ता. कर्जत जि. अहमदनगर

१२) रामा-६८ सिध्दटेक फाटा हिंगणगांव ते अंबालिका साखर कारखाना रस्ता इजिमा- ३३६ कि.मी. ०/०० ते ६/०० मध्ये सुधारणा करणे ता. कर्जत जि. अहमदनगर

१३) ग्रा.मा.७० राशीन सोनाळवाडी रस्ता ते सौताडेवस्ती ते थोरातवस्ती ते जाणभरेवस्ती ते ढगेवस्ती रस्ता किमी ०/०० ते ६/०० मध्ये सुधारणा करणे

१४) कोरेगांव गलांडवाडी जळकेवाडी निमगांव डाकु ते प्ररामा-०८ रस्ता प्रजिमा -११८ कि.मी. ०/०० ते ४/४०० (भाग कोरेगांव ते गलांडवाडी) मध्ये सुधारणा करणे ता. कर्जत जि अहमदनगर

१५) इजिमा-३३७ अळसुंदे डोंबाळवाडी म्हाळुंगी शेगुड लोणी मसदपुर जळकेवाडी पाटेवाडी ते रामा-१४१ नवसरवाडी ते इजिमा-१४४ रस्ता प्रजिमा-११२ कि.मी. २८/५०० ते ३३/१०० (भाग पाटेवाडी ते नवसरवाडी) मध्ये सुधारणा करणे ता. कर्जत जि अहमदनगर

१६) इजिमा-३३७ अळसुंदे डोंबाळवाडी म्हाळुंगी शेगुड लोणी मसदपुर जळकेवाडी पाटेवाडी ते रामा-१४१ नवसरवाडी ते इजिमा-१४४ रस्ता प्रजिमा-११२ कि.मी. ३/५०० ते ८/५०० (भाग देमनवाडी ते शेगूड) मध्ये सुधारणा करणे ता. कर्जत जि अहमदनगर

१७) खांडवी ते चाहुरवाडी रस्ता ग्रा.मा. ३४ किमी १/३०० ते २/२०० मध्ये सुधारणा करणे ता. कर्जत जि अहमदनगर

*जामखेड तालुक्यातील मंजुर रस्त्यांची कामे खालील प्रमाणे*

१) प्रजिमा ६९ ते वसेवाडी रस्ता ग्रा.मा.९३ कि.मी.०/०० ते २/०० भाग फक्राबाद जवळ मध्ये सुधारणा करणे

२) तेलंगशी ते जायभायवाडी रस्ता ग्रा.मा.१३६ कि.मीह.०/०० ते २/०० मध्ये सुधारणा करणे ता. जामखेड जि. अहमदनगर

३) रा.मा.५६ ते निमोणकर वस्ती कुसडगाव इजिमा ५२ ते सरदवाडी ते रा.मा.५६ ला मिळणारा मार्ग रस्ता इजिमा ३२० कि.मी. ७/५०० ते ९/५०० (भाग सरदवाडी ते रा.मा.५६) मध्ये सुधारणा करणे. ता. जामखेड

४) दिघोळ ते निर्मळ वस्ती ग्रा.मा.६९ कि.मी.०/०० ते १/२०० मध्ये सुधारणा करणे. ता. जामखेड जि. अहमदनगर

५) रा.मा.५५ ते कवादे वस्ती रस्ता ग्रा.मा.५७ कि.मी.०/०० ते १/०० मध्ये सुधारणा करणे ता. जामखेड जि. अहमदनगर

६) रा.मा. ५५ पासून अहिल्यानगर जामखेड जवळ रस्ता ग्रा.मा.१४ कि.मी.०/०० ते १/०० मध्ये सुधारणा करणे ता. जामखेड जि. अहमदनगर

७) राजुरी डाळेवाडी एकभुर्जी रस्ता ग्रा.मा.१८ कि.मी.०/०० ते १/२०० मध्ये सुधारणा करणे ता. जामखेड जि. अहमदनगर

८) रा.म.मा ४०९ ते अरणगांव पिंपरखेड हळगाव जवळा रस्ता प्रजिमा १०२ किमी २/०० ते ५/५०० व १०/०० ते १७/२०० मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता. जामखेड जि. अहमदनगर (पिंपरखेड ते जवळा)

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा