जामखेड येथील जामखेड नगररोडवर होणाऱ्या दहाव्या नविन कलाकेंद्रास विरोध

- Advertisement -spot_img

नगरपरिषदेने नाहरकत प्रमाणपत्र दिल्यास आमरण उपोषण करणार – सामाजिक कार्यकर्ते, गणेश भानवसे

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरात व तालुक्यात वाढत असलेली गुन्हेगारी व अवैद्य धंद्याच्या आनुशंगाने जामखेड शहरातील जामखेड नगररोडवर होणाऱ्या दहाव्या नविन कलाकेंद्रास विरोध होत आहे. तसेच नविन कलाकेंद्रास जामखेड नगरपरिषदेने नाहरकत प्रमाणपत्र दिल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते गणेश भानवसे यांनी मुख्याधिकारी, तहसीलदार व पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते गणेश भानवसे यांनी आज शुक्रवार दि 19 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी मुख्याधिकारी, तहसीलदार व जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जामखेड नगरपरिषद हद्दीत यापूर्वी देखील एकूण नऊ कला केंद्र आहेत. त्यामुळे जामखेड नगरपरिषद हद्दीत येथून पुढे नवीन कला केंद्रास कसल्याही प्रकारे कला केंद्र चालू करण्यासाठी जामखेड नगर परिषदेने ना हरकत प्रमाणपत्र आपल्या नगरपरिषदेमार्फत देण्यात येऊ नये.

तसेच दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी जाहीरनामा सूचना मधील जाहिराती मध्ये ना हरकत प्रमाणपत्राची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. आपल्या जामखेड नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी मनमानी कारभार करून नगरसेवकांची कसल्याही प्रकारे बॉडी तयार नसताना तसेच नगरपरिषदेचे मतदान होऊन नवीन बॉडी तयार झाल्यानंतर सदरचे नगरसेवक यांनी सर्वानुमते ठराव केल्याशिवाय कसल्याही प्रकारे नगरपरिषदेने ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येऊ नये.
जामखेड नगरपरिषदेने या कलाकेंद्रास नाहरकत प्रमाणपत्र दिल्यास मी आपल्या नगरपरिषद विरुद्ध जामखेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे. असा इशारा देखील सामाजिक कार्यकर्ते गणेश भानवसे यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे.

चौकट

जामखेड-नगर रोडवरील चिंचपूर हद्दीन पर्यंत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. याभागात नवीन घरे बांधून नागरीक रहात आहेत. मात्र याठिकाणी एक जुने कलाकेंद्र आसताना नवीन कला केंद्र सुरू झालेच तर आजूबाजूच्या जागांना देखील कवडीमोल भाव येणार आहे. परीणामी त्याठिकाणी जागा मालकांना आपली जागा खरेदी आणि विक्री करण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. जामखेड नगर परिषदेने देखील नागरिकांच्या हरकती मागवल्या आहेत. आता या होणाऱ्या नवीन कला केंद्रास नागरिकांचा कशा प्रकारे विरोध होणार व यानंतर नगरपरिषद नवीन कलाकेंद्रास ना हरकत प्रमाणपत्र देणार का? याकडे सर्वच जामखेडकरांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा