जमादारवाडी येथील वासराची शिकार,शेतकरी वर्गात भितीचे वातावरण

- Advertisement -spot_img

वनविभागाच्या मते लांडगा किंवा तरस असावा..
जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील जमादारवाडी येथे काल रात्री बिबट्याने शेतकरी हनुमान सुरेश आजबे या शेतकऱ्याच्या गोठ्यातील गाईच्या वासरावर हल्ला करून शिकार केली या गोठ्यात दोन गायी व एक वासरू बांधलेले होते रात्री तीनच्या दरम्यान वन्य प्राण्याने  वासराची शिकार केली आहे या वेळी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आल्याने त्याठिकाणी शेतकरी गेले आसता वासरू मृत आवस्थेत आढळून आले व वासराचा काही भाग खाल्लेला दिसुन आला आहे.

परिसरात शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण आहे. दररोज कोठे तरी बिबट्या दिसला अशा बातम्या येतात. काही वेळा फोटो एडिट करून अफवा पसरवल्या जातात तर काही वेळा खरोखर बिबट्या असतोच. रात्री केलेली वासराची शिकार बिबट्याने केलेली आहे असे ग्रामस्थ म्हणतात तर वनविभागाच्या मते ही शिकार लांडगा किंवा तरस या वन्य प्राण्याने केलेली असावी.

बिबट्या आपली शिकार नेहमी तोंडाकडील बाजूकडून करतो रात्री चे वासरू मागील बाजूकडून खाल्ले आहे हे तरस किंवा लांडगा या वन्य प्राण्यांनी खाल्ले असावे तसेच बिबट्या आगोदर शिकार मारतो व नंतर खातो लांडगा व तरस जिवंत पणेच खाण्यासाठी सुरूवात करतात यामुळे ही शिकार लांडगा किंवा तरस यांनी केलेली असावी वनविभागाच्या वतीने रितसर पंचनामा करण्यात आला आहे.

    काल दुपारी जमादारवाडी काटेवाडी शिवारात काही शेतकऱ्यांना बिबट्या सदृश्य प्राणी दिसुनही आला होता आणि रात्री वासराची शिकार केल्याने बिबट्याचा वावर या परिसरात आहे आसे शेतकऱ्यांनी सांगितले आहे

         दोन दिवसापुर्वी जामखेड शहरात बिबट्या आला आहे आशी आफवा पसरविली जात आहे आसे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले होते परंतु ग्रामीण भागात बिबट्याचा वावर आहे आसे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

        सध्या शेतातील कामांना वेग आला आहे ज्वारी, कांदा, गहु, हरभरा या पिकांना पाणी देण्यासाठी लगबग पाहावयास मिळत आहे त्यातच शेतीपंपांना दिवसाआड आठ दिवस रात्री व आठ दिवस दिवसा आसा विजपुरवठा करण्यात येत आहे त्यातच ज्वारी पिकांबरोबर उस बांधावरील वाढलेले गवत हे बिबट्याला लपून बसण्यासाठी जागा उपलब्ध आसल्याने शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

      याबाबत वनविभागाच्या वतीने या वासराचा पंचनामा करून याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

चौकट

नगरसेवक गणेश आजबे यांनी शेतकऱ्यांना अवहान केले आहे की सध्या शेती कामांसाठी शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतात जावं लागत आहे तसेच नाही म्हटले तरी हिंस्र प्राण्यांचा वावर आपल्या परिसरात जाणवत आसल्याने खबरदारी घ्यावी आसे सांगितले आहे.

चौकट

नागरिकांनी अंधारात एकटे फिरू नये, बॅटरी बरोबर ठेवावी, मोबाईल वर गाणे लावावीत, शेळ्या, मेंढ्या, वासरे कुंपणाच्या आत ठेवावेत हातात नेहमी काठी असावी. आपल्या पशूंची काळजी घ्यावी.

मोहन शेळके
(कर्जत-जामखेड उपविभागीय वनाधिकारी

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा