रत्नदीप मेडिकल कॉलेज विरोधात शिवप्रतिष्ठान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांचे दि २७ जुन पासुन पुन्हा आमरण उपोषण सुरू
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ या अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या सर्व शाखा मधिल सर्व विद्यार्थ्यांचे अश्वासन देऊनही इतर कॉलेज मध्ये तात्काळ स्थलांतर झाले नाही. त्यामुळे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांनी पुन्हा दि २७ जुन पासुन जामखेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या बाबत संबंधित मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी शिवप्रतिष्ठान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांच्या समवेत तहसीलदार व पोलीस निरीक्षक निरीक्षक यांना निवेदन दिले आहे.
पुढे निवेदनात म्हटले आहे की रत्नदीप मेडिकल फौंडेशन चे अध्यक्ष भास्कर मोरे याने वरील विषयानुसार उल्लेख केलेल्या विद्यापीठाच्या माध्यमातून विविध शाखा करुन विद्यार्थींनी व विद्यार्थींचे आर्थिक, मानसीक, शारिरीक शोषण करुन मोठे नुकसान केले आहे. त्यासंदर्भात रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या शाखेतील सर्व विध्यार्थी, ग्रामस्थ, विविध संघटना व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांनी मार्च २०२४ मध्ये दीर्घ काळ आंदोलन सुरू केले होते.
त्यानंतर त्याची दखल घेऊन संबधित विद्यापीठ, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आ. रोहित पवार आ. प्रा राम शिंदे खा.निलेश लंके यांनी गांभीर्याने दखल घेऊन सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. यावर विश्वास ठेऊन हे आंदोलन व पांडूराजे भोसले यांनी नऊ दिवसानंतर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले होते. मात्र तीन महीने होऊनही संबंधित विद्यार्थांचे कॉलेज इतर कॉलेज मध्ये स्थलांतरित झाले नाही. दोन्ही शाखांमधील विद्यार्थींचा रत्नदीप मेडिकल कॉलेजने वसुल केलेल्या फिस चा प्रश्न, शिक्षण पुर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले, तसेच बी फार्मसी विद्यार्थींनी व्यावसायिक परवाना काढण्यासाठी कॉलेज कडुन आवश्यक ती कागदपत्रे व सह्य शिक्के देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.
याबाबत मुळ विद्यार्थींचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच ३ महीन्यांपासून चालु असलेल्या प्रोसेस मध्ये विद्यार्थींच्या कॉलेज ट्रान्स्फर संबंधित कुठेही हवा तसा प्रतिसाद पुढील युनिवर्सिटी कडुन भेटला नाही. संबंधित विद्यापीठा कडुन विद्यार्थींचे शैक्षणिक नुकसान झाले तर यास वरील युनिवर्सिटी जबाबदार राहील असे देखील दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे पुढील शैक्षणिक वर्ष १० ते १५ दिवसात सुरू होत असल्याने निवेदनाचा विषय गांभीर्याने घेण्याची मागणी केली आहे.
जर वरील सर्व विषयांची विद्यापीठ व प्रशासनाने दखल घेतली नाही तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले हे विद्यार्थींनसमेत पुन्हा दि २७ जुन २०२४ पासुन आमरण उपोषणास बसणार आहेत. याबाबत चे नुकतेच निवेदन जामखेड चे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे. निवेदन देता वेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले, सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टाफरे, रीपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष सुनिल साळवे, गणेश जोशी, बाळासाहेब ढाळे, उत्कर्ष कुलकर्णी सह मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.