जामखेड शहरातील तपनेश्वर रोड अतिक्रमण ग्रस्त! प्रशासन सुस्त! नागरिक त्रस्त..

- Advertisement -spot_img

जामखेड शहरात वाहतुकीची कोंडी प्रशासनाने कारवाई करण्याची नागरिकांची मागणी..

जामखेड प्रतिनिधी –

जामखेड तपनेश्वर रोड येथे दर शनिवारी बाजार रस्त्यावर असल्याने होतोय चका जाम तालुक्यातील शेतकरी दर शनिवार दिवशी आपला माल विकण्यास जामखेड येथे येत असल्याने जामखेड येथील आडत दुकाने रस्त्यावरच लावत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.


तसेच तपनेश्वर रोड येथे रस्त्यावर बसत असल्याने शेतकऱ्यांचे होतोयत हाल मात्र जामखेड नगर परिषद शनिवार दिवशी आपला करवसूल तर करते मात्र शेतकऱ्यांना बसण्यास जागा उपलब्ध करून देत नाही. तसेच आडत दुकानासह फळ विक्रेत्याचाही  मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेला असून यामुळे चार चाकी वाहन खर्डा चौक येथून ते तपनेश्वर रोड येथे दर शनिवारी येत असल्याने नागरिकांना येण्या जाण्यास प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे कायमस्वरूपी तोडगा नगरपरिषदेने या बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रशासन फक्त बघण्याची भूमिका घेत असल्याचे सर्व सामान्य नागरिकाचे म्हणणे आहे. शनिवारी बाजार दिवस असल्याने खर्डा चौकातून तपनेश्वर रोड कडे जाणारी चार चाकी वाहनांना बंदी घालण्यात यावी तसेच जामखेड नगर परिषदेकडून तपनेश्वर रोड येथील अतिक्रमणे हटविल्यास व रस्ता मोकळा करून दिल्यास शेतकऱ्यांना व नागरिकांना त्रास सहन करण्याची वेळ येणार नाही अशी मागणी शेतकरी व नागरिक करत आहेत .

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा