संजय मुळे यांच्या वतीने सावलीसाठी मंडप,फराळ,पिण्याचे पाणी भाविकांसाठी उपलब्ध..
जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरात दरवर्षी नगरहून देवीचा पलंग घटस्थापनेपासुनच्या सातव्या माळेला दाखल होत आसतो जामखेड तालुका व शेजारील तालुक्यातील बहुसंख्येने भाविक तुळजाभवानी देवीच्या पलंगाचे दर्शन घेण्यासाठी जामखेड शहरात दाखल होत आसतात नवरात्रात हस्त नक्षत्र येत आसल्याने मोठ्या प्रमाणावर उन्हाचा तडाखा आसतो देवीचे भक्त आणवाणी पायाने दर्शनसाठी सकाळी लवकरच घर सोडतात त्यामुळे त्यांची गौरसोय दुर करण्यासाठी शहरातील मयुर ज्वेलर्सचे संचालक संजुशेठ मुळे यांनी गेली सोळा वर्षांपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पेठेशेजारील जागेत भाविकांना विसावा घेण्यासाठी मंडप व्यवस्था तसेच्या पिण्याचे पाणी फळं व फराळाची व्यवस्था करण्यात येते

यावेळी बोलताना संजुशेठ मुळे म्हणाले की नवरात्रीत सातवी माळेला फार मोठे महत्त्व आहे आणि नागेश्वराच्या पावनभुमीत देवीचा पलंग या माळेला शहरात येतो हे जामखेडकरांचे भाग्य आहे गेली आनेक वर्षांची ही परंपरा आहे या परंपरेनुसारच पलंगाचे स्वागत आजही जामखेडकर करताहेत

पलंगाबरोबर आनेक ठिकाणचे भाविक तुळजापुरकडे जात आसतात आपल्या हातुन त्यांची थोडीतरी सेवा घडावी याच निस्वार्थ भावनेने आयोजन आम्ही गेली आनेक वर्षे करत आलो आहोत आसे सांगितले
यावेळी मयुर ज्वेलर्सचे संचालक संजुशेठ मुळे,संपतनाना राळेभात, अमित चिंतामणी,सुनील शिंदे, कांतीलाल बोथरा, बंडु मुळे, जयदीप वेदपाठक, किशोर परदेशी, राजु बामदळे, हर्षद मुळे, किरण आंधारे, तसेच हिंदुराजकाका मुळे मित्रमंडळ व अजयदादा काशीद मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठय़ा भक्तीभावाने भक्तांच्या सेवेसाठी तत्पर होते.
