शिरगिरे यांनी सपत्नीक पुजा करत देवीची साडीचोळीने ओटी भरून केली आरती..
जामखेड प्रतिनिधी –

नवरात्रीच्या सनाला आनन्य साधारण महत्व आहे संपुर्ण देशभरात हा उत्सव साजरा केला जातो देवीच्या साडेतीन पिठात पैकी तुळजाभवानी वास्तव आसलेले राज्यातील तुळजापूर आहे जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावातुन याठिकाणहुन ज्योत प्रज्वलित करून आणली जाते व आपल्या गावात नऊ दिवस विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबर देवाचा जागर केला जातो याच अनुषंगाने जामखेड तालुक्यातील जांबवाडी येथे तुळजाभवानी मंदिरात सहाव्या माळेची पुजा व महाआरती सामाजिक कार्यकर्ते शहाजी शिरगिरे यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली देवाला साडी चोळी हारफुले भुषण अलंकार चढवुन आराधी मंडळींच्या उपस्थितत ही महाआरती करण्यात आली
यावेळी बोलताना शहाजी शिरगिरे म्हणले की आपल्या गावामधे जो नवरात्रीच्या निमित्ताने उत्सव होतो आहे तो आगदी नेत्रदीपक आहे सर्व आराधी मंडळी तरुण कार्यकर्ते या उत्सवात सहभागी होत आहेत
त्यामुळे आपल्या सर्वांवर देवीची कृपा आहे
आपण मनोभावे देवीची आराधना केल्याने जिवनात कोणत्याही गोष्टीची आपणास कमतरता भासणार नाही आज पुजेचा व आरतीचा मान अम्हा पती पत्नीला ग्रामस्थांनी दिला त्या बद्दल ग्रामस्थ व आराधी मंडळाचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आसे बोलताना सांगितले

यावेळी शहाजी शिरगिरे, जिजाबाई सागडे, सिंधुबाई शिरगिरे, श्रीराम सदाफुले, द्वारकाबाई शिंदे, बेगम सदाफुले, नंदा पठाडे, गयाबाई जायगुडे,गंगुबाई शेळके, सरोबाई पवार, भीमा डाडर, विजू खटके, दादा घायतडक, दीपक कोळेकर, भरत जायगुडे, बापूराव खंडागळे, ओम पठाडे, सुखदेव जायगुडे, दादा शिरगिरे, बापू शिरगिरे, चंद्रकांत जायगुडे, मदन शिरगिरे, भाऊ जायगुडे, नवनाथ सागडे, उषाबाई शेळके यांच्यासह आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते