
भक्ती शक्ती सेवा प्रतिष्ठान पाटोदा (ग) संस्थेच्या वतीने ग्रंथ प्रकाशन व वारकरी भुषण पुरस्कार वितरण सोहळा झाला संपन्न
जामखेड प्रतिनिधी(अशोक वीर)
ह. भ. प. बळीराम दादा आळंदीकर लिखीत “आम्ही वारकरी” या विषेश महिती संग्रहाचे प्रकाशन शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे गुरूजी यांच्या हस्ते संपन्न झाले तसेच वारकरी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराज मंडळींचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
वारकरी भुषण पुरस्कार भारत चव्हाण अंबादास भोगाडे रविंद्र खोत कालाप्पा कुटे प्रगतशील शेतकरी पुरस्कार रेवणनाथ मोरे आदर्श सेवा रत्न पुरस्कार भगवान सावंत शिवभुषण पुरस्कार संताजी पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी प्रसंगी बोलताना भिडे गुरूजी म्हणाले की ग्रंथ संपदा ही संस्कृतीची धर्माची व आपल्या देशाची खरी संपत्ती व ताकद आहे.
विश्वाला आपल्या कवेत घेणारे दैवत म्हणजे पांडुरंग परमात्मा सर्व संतांनी त्याची सेवा केली व वारकरी सांप्रदाय जगाच्या कल्याणासाठी निर्माण केला हिंदु धर्माचे पालन आचारण करणारा सांप्रदाय हा वारकरी सांप्रदाय आहे कशासाठी जगायचे कसं जगायचं हे सांगणार वारकरी संप्रदाय आहे
तो आपण चित्ती धरावा तसे समर्पित जिवन बळीराम महाराज जगत आहेत त्यांनी लिहलेला ग्रंथ हा वारकऱ्यांची दैनंदिनी ठरणारा आहे आसं त्यांनी या ग्रंथात लिहलं आहे
मोहमुड झालेल्या समाजाला जागृत करण्यासाठी शिवछत्रपतींनी कार्य केले व
हिंदवी स्वराज्य दिलं शब्दांनी शिकवण्यापेक्षा आचरणाने मावळ्यांना छत्रपतींनी शिकवण दिली
आज दुर्दैवाने म्हणावे लागेल की आपण हिंदवी स्वराज्यात आहोत आसे वाटत नाही कारण देशात गोंधळलेली परिस्थिती जाणवत आहे त्यासाठी शिवछत्रपतींचा वारसा घेऊन धारकरी व ज्ञानोबा तुकोबांचा वारसा घेऊन आपण वारकरी झालो पाहिजेत तरच खरं स्वराज्यात आहोत आसे वाटेल आसे भिडे गुरुजी म्हणाले..
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका धारकरी व वारकरी यांनी परिश्रम घेतले तसेच या कार्यक्रमाचे भारदार सुत्रसंचलन ह. भ. प. निकम महाराज यांनी केले
यावेळी विजय महाराज म्हसकर विठ्ठल महाराज पाटील गोविंद महाराज शिंदे डॉ दत्तात्रय महाराज चोरघे ज्ञानेश्वर ताटे डाॅ प्रविण कासार दत्तात्रय महाराज आंबी पांडुराजे भोसले नामदेव शेठ पाटील यांच्यासह पाटोदा खामगाव भवर वाडी रत्नापूर सांगवी व पंचक्रोशीतील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते