सनराईज इंग्लिश स्कूल येथे आठवडे बाजार व खाद्य पदार्थ महोत्सव संपन्न
जामखेड प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी आठवडी बाजार व खाद्यपदार्थ महोत्सव गरजेचे आहे, विद्यार्थ्यांना कमवा व शिका याची जाणीव होण्यासह तसेच मुलांना एक वेगळा आणि नाविन्यपूर्ण अनुभव देण्यासाठी तसेच मुलांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी प्रत्यक्ष कृतीतून व्यवहार ज्ञानाचे शिक्षण मिळावे यासाठी या आनंद मेळाव्याचे आयोजन केले होते. असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोरे यांनी केले.
सनराईज् मेडिकल & एज्युकेशन फौंडेशन चे सनराईज इंग्लिश स्कूल पाडळी फाटा येथे आज दिनांक २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता आठवडे बाजार व खाद्यपदार्थ महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना केंद्र प्रमुख राम निकम म्हणाले की, या बाजारातून विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाबरोबरच बेरीज, वजाबाकी, नफा-तोटा प्रत्यक्ष अनुभवास मिळाला. सनराईज स्कूल चे सर्व उपक्रम चांगले असतात. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नान्नज केंद्राचे केंद्रप्रमुख राम निकम, संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या प्रा. अस्मिता जोगदंड/ भोरे होत्या.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोरे, नान्नज केंद्राचे केंद्र प्रमुख राम निकम, सचिव प्रा.अस्मिता जोगदंड/भोरे, संचालक प्रा.तेजस भोरे, सनराईज् इंग्लिश स्कूल चे प्रिन्सिपल अमर भैसडे, साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय स्व.एम.ई भोरे जुनिअर कॉलेज पाडळी चे प्रा. विनोद बहीर, दादासाहेब मोहिते, प्रदीप भोंडवे, विवेक सातपुते, सुषमा भोरे, चंद्रकांत सातपुते, महेश पाटील, दिनकर सलगर, छबिलाल गावित, घाडगे सर, स्वाती पवार, महेश पाटील, हनुमंत वाघमारे, बुवासाहेब दहीकर, स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालयचे मुख्याध्यापक विजय मनेरे, सुनील पठाडे, अब्दुले सर, सविता काळे, साधना दंडवते, हनुमंत पाटील, रामभाऊ टिळेकर, आण्णा महारनवर आदी शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
या आठवडी बाजार व खाद्यपदार्थ महोत्सवामध्ये १०६ विद्यार्थ्यांनी आपली दुकाने थाटली होती.अवघ्या ६ तासांमध्ये ४३ हजार ९९६ रुपये आर्थिक उलाढाल या आठवडी बाजार व खाद्य पदार्थ महोत्सवात झाली. या बाल आनंद मेळाव्यात भाजीपाला, किराणा दुकान, खाऊ गल्ली, फळे, पाणीपुरी, वेगवेगळे चायनीज पदार्थ विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी आणले होते विद्यार्थ्यांचे पालक तसेच ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत विद्यार्थ्यांनी आणलेल्या वस्तू खरेदी केल्या.
हा उपक्रम यशस्वी राबवण्यासाठी सनराईज् इंग्लिश स्कूल चे प्रिन्सिपल अमर भैसडे, सुरज वाघमारे, हर्षा पवार, सानिया सय्यद, वैष्णवी तनपुरे, जयश्री साप्ते, दीपक दहीकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बिभिषण भोरे तर आभार प्रदर्शन जयश्री कदम यांनी मानले.