लोकसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघात चुरस,आ. राम शिंदे व आ. रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला

- Advertisement -spot_img



जामखेड प्रतिनिधी

अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी कर्जत जामखेड मतदारसंघात चुरशीने ६५.८१ टक्के मतदान झाले. नेते, कार्यकर्ते गावोगावी फोन करून रिपोर्ट घेत आहेत. या मतदारसंघात आघाडीवर सुजय विखे राहतील की निलेश लंके राहतील एवढाच प्रश्न आहे. ही निवडणूक विधानसभा निवडणुकीची पूर्वतालीम असल्याने आ. राम शिंदे व आ. रोहीत पवार यांनी प्रतिष्ठेची केली होती. आ. राम शिंदे तळ ठोकून होते तर आ. रोहीत पवार राज्यातील दौ-यातून वेळ काढून मतदारसंघात लक्ष देऊन होते. लंके, विखे गटाकडून विजयाचा दावा केला जात आहे त्यामूळे कोणाच्या अंगावर गुलाल पडतो याकडे जिल्हा नव्हे तर राज्याच्या नजरा लागल्या आहेत.
अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे निलेश लंके व महायुतीचे उमेदवार सुजय विखे हे दोन प्रामुख्याने उमेदवार होते. तर वंचित आघाडीचे उमेदवार दिपक खेडकर यांनी या लढतीत आपले अस्तित्व टिकून होते त्यांचा फटका कोणाला बसतो याबाबत वेगवेगळ्या चर्चा आहे. खासदार होण्यासाठी आ. राम शिंदे भाजपकडून इच्छुक होते. पण तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते परंतु त्यांची नाराजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर केली. यानंतर ते कर्जत जामखेडमध्ये सक्रिय राहिले. स्वताहाच्या निवडणुकीत ते एवढे पळाले नाही तेवढे ते देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी व खासदार भाजपचा व्हावा यादृष्टीने यंत्रणा हाती घेतली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आ खा.सुजय विखे यांना प्रत्यक्ष मतदारसंघात फिरवले व मतदारांची जबाबदारी स्वतहा घेतली. भाजप खेरीज इतर पक्षातील नेते कार्यकर्ते यांच्या बरोबर असलेली सलगी याचा फायदा घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर मोठी जबाबदारी आ. रोहीत पवार यांच्यावर पडल्यामुळे त्यांना जास्त वेळ बारामती व राज्यात लक्ष केंद्रित करावे लागले. यावेळेत त्यांनी कर्मभूमीवर लक्ष ठेवून होते. निलेश लंके यांची संवाद यात्रा, तालुका दौरा तसेच सभेतून मतदारसंघात केलेला विकास व प्रलंबित प्रश्न हे विषय मांडून जनतेचे लक्ष वेधले होते. तसेच मतदारसंघात सायकल वाटप, वैयक्तिक लाभ यावर खाजगीत लक्ष केंद्रित करून मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न झाला. तसेच सांगता सभा यशस्वी ठरल्याने मतदार कोणाला कौल देतात हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
या निवडणुकीत देशाच्या प्रश्नाऐवजी स्थानिक प्रश्न महत्त्वाचे ठरले त्यामुळे झालेल्या सभेतून देश व आंतरराष्ट्रीय प्रश्नासमवेत शेतीला बारमाही पाणी, दिवसा लाईट तसेच कांदा प्रश्न, वाढती महागाई बेरोजगारी हे प्रश्न महायुतीसाठी डोकेदुखी तर महाविकास आघाडीसाठी फायद्याची ठरली तर महीलांना एसटी बसमधून सरसकट अर्धे तिकीट, केंद्र व राज्य सरकारची शेतकरी सन्मान निधी, आयुष्यमान भारत, अर्थिक दुर्बल घटकांना मोफत गहू तांदूळ, घरकुल तालुक्यात झालेले रस्त्याची कामे हे मुद्दे भाजप उमेदवाराला पोषक ठरले.

उमेदवारापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी रहावे यासाठी मतदारांनी पसंती दिली. तर निलेश लंके यांची काम करण्याची पध्दत मदतीला धावणारा नेता व आ. रोहीत पवार यांचे व्हिजन यामुळे मतदार संभ्रम अवस्थेत होता. तसेच विखेंची अहमदनगर लोकसभा शेवटची निवडणूक आहे. शिर्डी लोकसभा खुला मतदारसंघ होत आहे. मागील चार वर्षांत विखेनी मतदारसंघात पाठ फिरवली यापुढे जिल्हा विभाजन आदी मुद्दे चर्चेला गेले.
आ. राम शिंदे व आ. रोहीत पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघात आपणच उमेदवार असल्याचे दाखवून शेवटच्या घटकांपर्यंत जाऊन मताचा जोगवा मागितला तसेच चार महिन्यांनी विधानसभा निवडणुक होणार असल्याने या निवडणुकीत आपली स्वताची पेरणी केली. परंतु आघाडीतील घटक पक्षांना पुरेसा न्याय देऊ शकले नाहीत. कर्जत जामखेड मतदारसंघातून मागील लोकसभा निवडणुकीत २४ हजाराचे मताधिक्य खा. सुजय विखे यांना होते यावेळी मताधिक्य वाढेल की कमी होईल. आ. रोहीत पवार यांनी केलेले विकासकामे निलेश लंके साठी फलदायी ठरतील हे मतमोजणी नंतर दिसून येईल.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा