या निवडणुकीत भुमीपुत्राचा मुद्दा गाजणार का? येणार काळ ठरवणार!!
जामखेड प्रतिनिधी
कर्जत- जामखेड मतदारसंघात शरद पवार गटाचे रोहित पवार हे मागील 2019 सालच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि त्यावेळी मोठ्या मताधिक्याने ते निवडून देखील आले होते. विशेष म्हणजे गेल्या 25 वर्षाच्या कर्जत – जामखेडच्या भाजपच्या बाली किल्ल्याला सुरुंग लावला. मात्र यावर्षीची 2024 ची विधानसभा निवडणूक कोणत्याच विधानसभेच्या इच्छुक उमेदवाराला म्हणावी तेवढी सोपी नाही. सध्या आमदार प्रा. राम शिंदे हे विधान परिषदेचे सदस्य जरी असले तरी ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आनुशंगाने गेल्या अडीच वर्षांपासून आपल्या मतदार संघात सक्रिय काम करत आहेत. मात्र तरी देखील भाजप बरोबरच कर्जत जामखेड मतदार संघात अजित पवार गटाच्या इच्छुकांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे कर्जत-जामखेड मतदार संघात महायुतीकडून मराठा उमेदवार देणार का? इतर कोणास उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील बहुतेक विधानसभा मतदारसंघात प्रत्येक राजकीय पक्षाकडे विधानसभा उमेदवारी साठी एका पेक्षा जास्त तुल्यबळ उमेदवार आहेत. जे सर्व ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरू शकतात. मात्र याला अपवाद होता. जामखेड-कर्जत विधानसभा मतदारसंघ त्यामुळे भाजपचे राम शिंदे यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्थानिक पातळीवरील पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी न देता आपल्याच घराण्यातील रोहीत पवार यांना भाजपच्या राम शिंदे यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरून राजकीय बाजारपेठेत आणले आशी चर्चा आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे योगदान आहे हे नाकारून चालणार नाही.
जामखेड-कर्जत हा विधानसभा मतदार संघावर अजित पवार यांचा सुरूवाती पासूनच प्रभाव व दबदबा आहे. परंतु आता राज्यात अनपेक्षित घडामोडींमुळे राजकीय परिस्थिती पुर्णपणे बदललेली असून सर्वच विधानसभा मतदारसंघात त्याच्या परीणाम जाणवणार आहे. त्यानुसार जामखेड-कर्जत विधानसभा मतदारसंघात देखील राजकीय परिस्थिती पुर्णपणे बदलली आहे. ही जागा भाजपाच्या वाट्याला असली तरी राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्या विरोधात उमेदवार देताना उपमुख्यमंत्री अजित पवार व ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची भुमिका महत्त्वाची असणार आहे. कारण रोहित पवारांना राज्य स्तरावर नेतृत्व करण्याची झालेली घाई पाहता काहीही झाले तरी त्यांना रोखून परत बारामतीला पाठविण्यासाठी राजकीय व्युवरचना तयार असल्याचे बोलले जात आहे. गरज भासल्यास त्यासाठी राम शिंदेंना थांबवून रोहीत पवारांच्या विरोधात भाजपा राम शिंदे यांना विश्वासात घेऊन मराठा उमेदवार देऊ शकतो याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात अजित पवार व राधाकृष्ण विखे पाटील यांची राजकीय भुमिका व चाल महत्त्वाची असणार आहे. जामखेड-कर्जत विधानसभा मतदारसंघात कर्जत मधुन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र गुंड, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रविण घुले तर जामखेड तालुक्यातुन रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर (आबा) राळेभात, यांच्या पैकी ज्यांच्या नावावर अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील व राम शिंदे यांचे एकमत होईल त्याची उमेदवारी अंतिम केली जाईल अशी चर्चा सुरू आहे. यापैकी अंबादास पिसाळ हे कट्टर विखे समर्थक आहेत तर राजेंद्र फाळके, राजेंद्र गुंड, मधुकर राळेभात हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत तर डॉ. भास्कर मोरे पाटील हे पुर्वी जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असले तरी मागील काही वर्षांपासून ते रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर या संस्थेच्या माध्यमातून स्वतंत्रपणे शैक्षणिक व सामाजिक काम करत असुन ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक म्हणूनच त्यांची ओळख आहे. तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेही देखिल त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. राम शिंदे व डॉ.भास्कर मोरे पाटील यांची मैत्रीपूर्ण संबंध सर्वांना माहित आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहीत पवार यांच्या विरोधात मराठा उमेदवार देताना या नावांपैकी एक अंतिम करण्यात येईल असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
विकास कामांन बरोबरच शैक्षणिक संस्था बाबत बोलायचे झाले तर कर्जत-जामखेड मतदारसंघ हा शैक्षणिक क्षेत्राच्या दृष्टीने खुप मागे आहे. त्यातच जामखेडचे डॉ भास्कर मोरे यांनी स्वतःच्या हिम्मतीवर रत्नादीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापुर तालुका जामखेड या संस्थेच्या माध्यमातून मतदार संघात होमियोपॅथिक मेडीकल कॉलेज, आयुर्वेद मेडिकल कॉलेज ,फार्मसी कॉलेज, नर्सिंग कॉलेज सुरु करून शैक्षणिक बाबतीतला मागासलेला दूर करून विकासाला हातभार लावला आहे. मात्र राजकीय विरोधापोटी डॉ भास्कर मोरे यांच्यावर कारवाई करण्यात आली असा आरोप सध्या आ. रोहित पवार यांच्यावर विरोधकांकडून होत आहे. त्यामाध्यमातून डॉ.भास्कर मोरे व त्यांच्या संस्थेबद्दल समाजात जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करून संस्थेवर कारवाई करण्यास भाग पाडले आसे विरोधकांकडून बोलले जात आहे. त्यामुळे जनतेने स्वाभिमान जागृत करून निर्णय घेण्याची वेळ आली आहे आणि स्वाभिमानी व सुज्ञ मतदार यावेळी निश्चितस् स्वाभिमानी निर्णय घेतील याची मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे.