जामखेड प्रतिनिधी
वुशु असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित कोइंबटूर, तामिळनाडू येथे नुकत्याच राष्ट्रीय ज्युनियर वुशु स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये जामखेड चा खेळाडू योगेश मारुती वाघमोडे याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत कांस्यपदक मिळविले. योगेशने मागील वर्षी शालेय राज्य वुशु स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळविले होते . योगेश च्या घरची जेमतेम परिस्तिथी असताना योग्य मार्गदर्शन व मेहनतीच्या जीवावर त्याने राष्ट्रीय वुशु स्पर्धेमध्ये यश मिळविले.योगेशने नवीन मराठी शाळा, जामखेड येथे वुशु जिल्हा संघटनेचे सचिव , आंतरराष्ट्रीय खेळाडू व एन आय एस कोच लक्ष्मण उदमले उपाध्यक्ष व प्रशिक्षक शाम पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला आहे. त्याला ऑल महाराष्ट्र वुशु असोसिएशनचे सचिव सोपान कटके, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे साहेब, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे, कर्जत जामखेडचे आमदार रोहित दादा पवार व आमदार प्रा. राम शिंदे साहेब, माजी जि.प.सदस्य प्रा. मधुकर राळेभात, ल.ना. होशिंग विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग सर, उमेश देशमुख, प्रशिक्षक लक्ष्मण उदमले,शाम पंडित,आबा जायगुडे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले.