जामखेड प्रतिनिधी
शाळा सुटल्यानंतर रस्त्यावर अडवून तु माझ्या घरी चल नाहीतर तुला जिवे मारुन टाकेल आशी धमकी देत दोन तरुणांनी एका अल्पवयीन मुलीवर वेगवेगळ्या वेळी व ठिकाणी बळजबरीने अत्याचार केला. विशेष म्हणजे पिडीत अल्पवयीन मुलगी ही गर्भवती राहीली असल्याचा धक्कादायक प्रकार जामखेड तालुक्यात उघडकीस आला आहे.
या प्रकरणी आरोपी राजेश बबन उगले व बाळासाहेब काशिनाथ लेंडे दोघे रा. नायगाव ता. जामखेड यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की जामखेड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन पिडीत मुलगी वय 14 वर्षे 9 महीने ही एका शाळेत शिकत आहे.
या घटनेतील पहीला आरोपी राजेश बबन उगले याने जुन 2023 मध्ये (तारीख आठवत नाही) शाळा सुरू झाल्या नंतर दहा ते पंधरा दिवसांनी पिडीत मुलीची शाळा सुटल्यानंतर आरोपी याने तिला रस्त्यावर अडवून तु माझ्या सोबत आमच्या घरी चल नाहीतर जीवच मारुन टाकेल आशी धमकी देऊन अत्याचार केला. तसेच ही घटना कोणाला सांगितली तर तुला जिवे ठार मारण्याची धमकी दिली व वेळोवेळी पिडीत मुलीवर अत्याचार केला. तसेच दि 28 मार्च 2024 रोजी वार्षिक परीक्षा दरम्यान देखील पिडीत मुलीस धमकावून घरी बोलावून अत्याचार केला व पिडीत अल्पवयीन मुलीस गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पिडीत मुलीने तिच्या जबाबात सांगितले की तिच्या रहात्या घरामध्ये एकटी असताना दुसरा आरोपी बाळासाहेब काशिनाथ लेंडे रा.नायगाव ता. जामखेड हा पिडीत मुलीच्या घरी पाणी पिण्याच्या बहाण्याने घरी गेला व अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. तसेच दि 26 जानेवारी 2024 रोजी आरोपी बाळासाहेब लेंडे त्याचे शेतामध्ये ज्वारीचे कणसे टाकत असताना पिडीत मुलीवर ज्वारी मध्ये बळजबरी शारीरिक संबंध केले. असे तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेत पिडीत अल्पवयीन मुलगी ही गर्भवती राहीली असल्याने एकाच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात पिडीत मुलीच्या आईने दि 5 जुन 2024 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून नायगाव येथील आरोपी राजेश बबन उगले व बाळासाहेब काशिनाथ लेंडे यांच्यावर खर्डा पोलीस स्टेशनला बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर तातडीने खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ संभाजी शेंडे, पो.कॉ शशी म्हस्के, पो.कॉ बाळु खाडे, पो.कॉ. अशोक बडे यांच्या पथकाने दोन्ही आरोपींचा शोध घेत अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड हे करत आहेत.