काबाड कष्टाने बायजाबाईने आपल्या लाडक्या लेकाला केला मोठ्ठा डाॅक्टर

- Advertisement -spot_img

डॉ. अभिजित शशिकांत हराळ यांनी खडतर परिस्थितीवर मात करत एम बी बी एस चे स्वप्न केले पुर्ण..

जामखेड प्रतिनिधी
घरची परिस्थिती हालाकिची परंतु माय लेकराला शिक्षणाचे महत्त्व समजले होते आणि शिक्षणाशिवाय जिवनात आता काहीच महत्वाचे नाही आणि ते पुर्ण करण्यासाठी
काबाड कष्ट करू ही खुणगाठ मणाशी बांधुन बायजाबाईंनी अभिजित च्या शिक्षणाचा पाया रचला त्यानेही जिद्द चिकाटीने आभ्यासात सातत्य राखत  नवोदय परिक्षेत यश मिळविले. दहावीला जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर येथे प्रवेश घेतला व चांगली गुणवत्ता मिळवत अकरावी बारावीसाठी दक्षणा फौंडेशन येथे तयारी करत अकरावी बारावीला चांगला आभ्यास करून डॉक्टर होण्यासाठीच्या परिक्षेत चांगले मार्क मिळवून एम बी बी एस साठी सेठ. जी. एस. मेडिकल कॉलेज आणि केम हाॅस्पीटल मुंबई येथे शिक्षण पुर्ण केले.

     आपण जर जिद्द चिकाटीने परिश्रम केले तर कितीही अडथळे आले तरी हमखास यश मिळतेच त्यासाठी आपल्या कुटुंबाचा आधार ही फार महत्वाची गोष्ट आहे परिस्थितीवर मात करून आपण अभ्यासात सातत्य राखुन शिक्षण घेऊ शकतो हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनसाठी अभिजितने आदर्श दिला आहे.


  या यशाबद्दल श्री. सिद्धार्थ साळवे सर, सौ. शकुंतला साळवे मॅडम, प्रा. डॉ. आश्र्विनी गायकवाड मॅडम व वैभव साळवे कृषी अधिकारी , कंडक्टर  बजरंग समुद्र व त्यांच्या पत्नी मनिषा हया उभयतांनी अभिजित लां मोलाची साथ दिली यांनी ही अभिजितचे अभिनंदन केले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा