जामखेड-श्रीगोंदा रोडवरील भिषण आपघात..

- Advertisement -spot_img

जामखेड-श्रीगोंदा रोडवरील भिषण आपघात,दोन शासकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू..

जामखेड प्रतिनिधी

जामखेड-कर्जत रोडवरील पाटोदा गरडाचे गावाजवळील वळणावर चारचाकी वाहन व आयशर टॅम्पो या दोन वाहनाची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या भिषण अपघातात श्रीगोंदा तालुक्यात शासकीय सेवेत असलेल्या दोन शासकीय कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. आपघात एवढा भिषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. या आपघात प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला टॉम्पोचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संबंधित रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

निखिल मोतीलाल बहुरे, रा.प्लॉट नंबर ६५ राजे संभाजी कॉलनी, जळगाव रोड, जाधववाडी हर्सूल ता.जि.छत्रपती संभाजीनगर, हल्ली रा. श्रीगोंदा, जिल्हा. अहिल्यानगर व रामचंद्र महाजन बहुरे, रा. बेंबळ्याचीवाडी. पोष्ट. खोडेगाव. ता. जि. छत्रपती संभाजीनगर, हल्ली रा. श्रीगोंदा आशी अपघात मयत झालेल्या दोन शासकीय कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

या बाबत अधिक माहिती अशी की आज रविवार दि १९ जुलै २०२६ रोजी रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास वरील दोन शासकीय कर्मचारी निखिल मोतीलाल बहुरे व रामचंद्र महाजन बहुरे हे दोघे चुलतभाऊ त्यांच्या मुळगाव संभाजीनगर या ठिकाणाहून श्रीगोंदा येथिल नोकरीच्या ठिकाणी एम.एच -२० जी. ई-३५६२ या क्रमांकाच्या चारचाकी वहानाने चालले होते. तर श्रीगोंदा रोडवरून आयशर टॅम्पो क्रमांक एम. एच १४ – बी. जे २२९३ या वाहनातून जामखेड कडे येत होते. याच वेळी रविवार दि १९ रोजी रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास दोन्ही वाहने जामखेड श्रीगोंदा रोडवरील जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे गावाजवळील वळणावर आली होती. यावेळी परिसरात रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्याने दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे एका बाजूचा रस्ता बंद करून केवळ एका लेनवरून वाहतूक सुरू होती. दरम्यान याच वेळी दोन्ही वाहने समोरासमोर एकच लेनवर आली आणि यामध्ये याच ठिकाणी भरधाव वेगातील दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला व या आपघातात चारचाकी वाहनातील शासकीय कर्मचारी निखिल मोतीलाल बहुरे व रामचंद्र महाजन बहुरे या दोन चुलतभावांचा जागीच मृत्यू झाला. आपघात घडल्या नंतर टॅम्पो चालक घटनास्थळाहुन फरार झाला आहे.

आपघातात मयत झालेले निखिल मोतीलाल बहुरे, हे मुळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत ते सध्या श्रीगोंदा तहसील कार्यालय येथे महसूल सहायक म्हणून नोकरीस आहेत. तर दुसरे मयत रामचंद्र महाजन बहुरे, हे देखील छत्रपती संभाजीनगर येथील बेंबळ्याचीवाडी येथिल रहीवाशी आसुन ते सध्या श्रीगोंदा येथिल पाटबंधारे विभाग येथे मोजणीदार म्हणून नोकरीस आहेत. दोघेही चुलतभाऊ असल्याचे समजते ते आपल्या श्रीगोंदा येथिल नोकरीच्या ठिकाणी जात असताना जामखेड जवळ सदरचा आपघात घडला आहे.

आपघाताची माहिती समजताच जामखेड चे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघ, पो. कॉ. सचिन चव्हाण, वहान चालक यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना गाडीचा पत्र तोडुन बाहेर काढले व जामखेड ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता ते पुर्वीच मयत झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. टॅम्पो चालकाचे नाव समजु शकले नसुन तो आपघात घडल्यानंतर घटनास्थळाहुन रात्रीच फरार झाला आहे. पोलीसांनी त्याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ हे करित आहेत..

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा