अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता अध्यात्म विज्ञान व्यवहार यांची सांगड घालून जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन

जामखेड प्रतिनिधी
जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा रविवारी जामखेड शहरातील हॉटेल सुंदराईच्या मागे, कोठारी पेट्रोल पंपाजवळ, कर्जत-जामखेड कॉर्नर, नगररोड, जामखेड याठिकाणी मोठ्या उत्साह वातावरणात संपन्न झाला. यावेळी महन्मंगल समयी तालुक्यातील सर्व भाविकांनी सहकुटुंब सहपरीवार कार्यक्रमास उपस्थित राहुन पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक 10 वाजता जगद्गुरुश्रींच्या सिद्ध पादुकांची जामखेड शहरातून भव्य मिरवणूक काढून नंतर पादुका कार्यक्रमाच्या संत पिठावर विराजमान करण्यात आल्या यानंतर गुरुपूजन , आरती, प्रवचन, उपासक दीक्षा, दर्शन व पुष्पवृष्टी इत्यादी कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणामध्ये भाविकांच्या जल्लोषात पार पडला.

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेहमी लोकपयोगी सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये जामखेडच्या कार्यक्रमांमध्ये टॉयलेट व्हॅन भेट देण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते चावी देऊन त्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी आष्टी, पाटोदा व शिरूर चे लाडके आमदार सुरेश (आण्णा) धस, शरददादा कार्ले, भगवानदादा मुरूमकर, अमित चिंतामणी, पवन राजे राळेभात, केदार रसाळ, ढेपे सर राहुल शेठ बेदमुथा हे उपस्थित होते. तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण शैक्षणिक साहित्य वाटप, संस्थांनच्या वतीने 53 ॲम्बुलन्स महाराष्ट्रभर मोफत सेवा आणि श्री क्षेत्र नाणीजधाम येथे 24 तास हॉस्पिटल सेवा सुरू आहे. गोर-गरीब शेतकऱ्यांना मोफत बियाणे खते, औषधे, शेती अवजारे वाटप केली जातात. दुष्काळ पडल्यास संस्थानच्या वतीने जनावरांना शेकडो टन चारा पूरविला जातो.
अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता अध्यात्म विज्ञान व्यवहार यांची सांगड घालून जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन केले जाते. निराधार महिलांना शिलाई मशीन, शेळ्या-मेंढ्या दूभत्या गाई म्हशीचे वाटप केले जाते. अशा प्रकारे अनेक उपक्रम राबविले जातात. कार्यक्रमात येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. भाविकांनी जगद्गुरु श्रींच्या अमृतवाणीचा, पादुका दर्शनाचा व महाप्रसादाचा मन भरून लाभ घेतला.