भारत गॅस एजन्सी येथील दोन गाडीच्या बॅटऱ्या चोरणारा अरोपी एका तासात जेरबंद !!
जामखेड प्रतिनिधी
दि. 13/9 /2024 रोजी भारत गॅस एजन्सी आरोळे दवाखान्याच्या पाठीमागे गॅस एजन्सी मधील गाडीच्या दोन बॅटऱ्या आज्ञा चोराने चोरी गेल्याची फिर्याद सुरज बाळासाहेब पोकळे यांनी जामखेड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती
त्यानुसार भारत गॅस एजन्सी गोडाऊन येथे महेंद्र जितो कंपनीची गाडी क्रमांक MH-16 – CD-28 12 या गाडीचे बॅटरी चोरी गेली आहे. तसेच दुसरे गाडी महेंद्र जितो गाडी क्रमांक MH-16CD 2805 हिची पण अँमेरॉन कंपनीची बॅटरी चोरी गेली आहे अशी फिर्याद जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. त्यानुसार जामखेड चे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या आदेशाने पोलीस हवालदार प्रवीण इंगळे यांना चौकशीसाठी पाठविले असता त्या ठिकाणी चौकशी केली असता त्यानी सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्या ठिकाणी त्यांना अज्ञात इसमाला संशयित म्हणून ताब्यात घेतले. तसेच अज्ञात व्यक्ती हा लक्ष्मी चौक येथे त्यांना आढळून आला असता त्यांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेले असता आरोपीला पोलीस खाकी दाखविताच बॅटऱ्या चोरी केल्याची कबुली अरोपीनी दिली. आरोपीला अटक केल्यानंतर कर्जत कोर्टासमोर हजर केले असता आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.तसेच अरोपी कडुन दोन बॅटऱ्या रिकव्हरी पण करण्यात आल्या आहे. पुढील तपास पोलीस नाईक सरोदे हे करीत आहे.