महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी सर्वच नेते कार्यकर्तेही सक्रीय होणार :आ. प्रा.राम शिंदे
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील प्रसिद्ध खाऊगल्ली अशा भेळ या ठिकाणी आ. राम शिंदे यांनी भेट दिली. यावेळी डि वाय एस पी पदी निवड झालेले नितीन खेत्रे यांचा सत्कार आ. राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच जामखेड शहराच्या खाव्वायांसाठी प्रफुल्ल सोळंकी व पत्रकार किरण रेडे यांनी खाऊगल्ली सूरू केली आहे जामखेडमध्ये एकाच छताखाली शभंर पदार्थांची मेजवानी उपलब्ध करून दिली आहे जामखेडकरांनी याचा नक्की आस्वाद घ्यावा तसेच युवकांनी व्यवसायीक झाले पाहिजे व आपल्या परिसराची गरज ओळखून व्यवसायात पदार्पण करावे आसे बोलताना सांगितले
तसेच देशात लोकसभा निवडणुकीतचे वारे वाहू लागले आहे तसे राज्यातही निवडणूका होऊ घातलेल्या आहेत अहिल्यानगर दक्षिणेची जागा महायुतीच्या वतीने खा. सुजय विखे पाटील हे लढवत आहेत.
सर्वच पक्ष या निवडणुकीसाठी गतीने तयारी करत आहेत भारतीय जनता पार्टी व महायुतीचे सर्वच जण निवडणुकीसाठी सज्ज झालोलो आहोत विखे पाटील यांच्या निवडणूक तयारी साठी बैठकांचे सत्र सुरू आसुन तालुकास्तरावर बैठकांचे आयोजन लवकरच होणार आहे आसे बोलताना आ. प्रा. राम शिंदे यांनी सांगितले
आ. राम शिंदे व विखे यांच्यातील वाद देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने मिटला आसल्याचे माध्यमांशी बोलताना काल दोन्ही नेत्यांनी सांगितले आसले तरी आ. राम शिंदे यांचे कार्यकर्ते म्हणतात तुमचे मिटले आमचे नाही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देताना आ. राम शिंदे म्हणाले की कार्यकर्ते भाजपचेच आहेत, मी देखील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, आणि उमेदवार देखील भारतीय जनता पार्टीचा आसल्याने घरातील भांडण हे घरातच मिटणार आसल्याचे त्यांनी सांगितले
यावेळी त्यांच्या समवेत पं. स. माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर,शरद कार्ले, अमित चिंतामणी, बिभीषण धनवडे,पोपट राळेभात, पवन राळेभात, प्रवीण चोरडिया, सोमनाथ राळेभात, बापुराव ढवळे, सोमनाथ पाचरणे,बाजीराव घोपाळघरे, डॉ गणेश जगताप, मनोज कुलकर्णी, लहु शिंदे, डॉ अल्ताफ शेख, प्रफुल्ल सोळुंकी, पत्रकार किरण रेडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.