जामखेड मध्ये अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त स्वच्छता मोहीम व महाआरती

जामखेड प्रतिनिधी
श्री क्षेत्र चौंडी हे अहिल्यादेवींचे जन्मगाव आहे आणि याच जामखेड तालुक्यात आपला जन्म झाला हे आपले भाग्य आहे. अहिल्यादेवींच्या तिनशेव्या जयंती निमित्त देशभर स्वच्छता मोहीम व महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. याच धर्तीवर जामखेड येथे नागेश्वर मंदिर परिसरात धाकटी नदी व मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली यावेळी प्रा. राळेभात बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर (आबा) राळेभात, भाजपा ग्रामीण मंडल अध्यक्ष बापुराव ढवळे, शहर मंडल अध्यक्ष संजय (काका) काशिद, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, मनोज कुलकर्णी, पवन राळेभात, प्रविण चोरडिया, डॉ. विठ्ठल राळेभात, सुनिल यादव, मोहन (मामा) गडदे, अँड संजय पारे, सरपंच संगिता पारे, अभिजीत राळेभात, राहुल चोरगे, प्रविण होळकर, जाकीर शेख, दिगंबर चव्हाण, रंगनाथ राजगुरू, संदीप ठोंबरे, उमेश कांबळे, संदीप भंडारी, आण्णा विटकर, आण्णा ढवळे, चेअरमन उद्धव हुलगुंडे,

यावेळी बोलताना प्रा. राळेभात म्हणाले की, अहिल्यादेवींनी संपूर्ण देशात नदीवरील घाट व मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम केले तसेच काम सभापती प्रा राम शिंदे यांच्या माध्यमातून सुरू आहे. नागेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी दहा कोटी चा निधी दिला आहे. आता परिसर विकासासाठी व नदी सुशोभीकरणासाठी आणखी निधीची आवश्यकता आहे तिही शिंदे साहेब लवकरच पुर्ण करतील असे सांगितले.

यावेळी बोलताना शहर मंडळ अध्यक्ष संजय काशिद म्हणाले की, अहिल्यादेवींनी मोघलांच्या साम्राज्याला न डगमगता हिंदुत्वाची पताका देशभर राबवित मंदिर जीर्णोद्धार केला तसेच काम सध्या सभापती प्रा राम शिंदे यांच्या माध्यमातून परिसरात सुरू आहे. तरी जामखेड परिसरातील नागरिकांनी ३१ मे रोजी चौंडी येथे जयंती कार्यक्रमासाठी यावे असे आवाहन काशिद यांनी केले.

*यावेळी बोलताना ग्रामीण मंडल अध्यक्ष बापुराव ढवळे म्हणाले की, अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त मंदिर व नदी स्वच्छता मोहीम भाजपाच्या वतीने ३१ मे पर्यंत राबविण्यात येणार आहे. तालुक्यातील आज नागेश्वर मंदिर उद्या जवळेश्वर, नंतर खर्डा येथील जोतीर्लिंग मंदिर, साकत येथील श्री साकेश्वर महाराज मंदिर परिसराची स्वच्छता मोहीम सभापती प्रा राम शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे तरी स्वच्छता मोहीम व महाआरती कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन केले.
यावेळी बोलताना अरणगावच्या सरपंच सौ. संगिता पारे म्हणाल्या की, भाजपा व महिला आघाडीच्या वतीने अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त आम्ही तालुक्यातील मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.