मेघगर्जनेसह जामखेड तालुक्यात अवकाळीच्या बरसल्या सरी..

- Advertisement -spot_img

गेली दोन दिवसांपासुन आवकाळी पावसाची दमदार हजेरी,शेतीच्या मशागतीला येणार आहे वेग.

जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यात मागील दोन तीन दिवसांपासून मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले आहे त्यामुळे आता शेतीच्या मशागतीला वेग येणार आहे तालुक्यातील काही भागात आवकाळी पावसाने मशागतीला सुरू झाल्या आहेत परंतु काही भागात आद्याप पाऊस झाला नसल्याने शेतीची मशागत थांबली होती
   गेली दोन दिवसांपासुन सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता आणि अकाशात ढग दाटून येत होते तसेच फेब्रुवारी पासुनच तापमानाचा पारा चढला होता आणी में मध्येतर उच्चांकी तापमानाची नोंद झाली
त्यामुळे उकाड्याने आंगाची लाही लाही होत होती आवकाळी पावसाच्या सरी बरसल्याने वातावरण आल्हाददायक झाले आहे.

  दोन दिवस झालेल्या पावसाने नदी नाल्यांमध्ये तसेच शेतात पाणी दिसुन येत आहे त्यामुळे आता बळीराज्याची शेतीच्या मशागतीसाठी लगबग सुरू झाली आहे

पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे मान्सून पुर्व पावसामुळे शेतीची मशागत पुर्ण होऊन मृग नक्षत्रात खरीप पिकांच्या पेरण्या केल्या जातात जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उडीद,मुग,सोयाबीन,बाजरी या पिकांचा पेरा होतो या नक्षत्रात चांगला पाऊस झाला तर पेरण्याही वेळेवर होतात त्यामुळे पुढील पिकांचे चांगले नियोजन बळीराजाला करता येते याच पाश्र्वभूमीवर जामखेड तालुका कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन केले जाते त्यामुळे या पावसाचे बळीराजाने मोठ्या आनंदात स्वागत केले आहे

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा