उद्या दुपारी दोन वाजता विंचरणा तिरावरील भगवान शंकराच्या मुर्ती पासुन होणार मिरवणूकीस प्रारंभ…
जामखेड प्रतिनिधी
कर्जत जामखेड मतदारसंघात आ. रोहित पवार यांची दुसर्यांदा आमदार पदी निवड झाली त्या आनुशंगाने निवडीनंतर विजयी मिरवणूक काढण्यात संदर्भात जामखेड तालुक्यातील पदाधिकारी यांनी बैठक घेऊन नियोजन केले आहे आणि उद्या दिनांक 3 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता ही भव्य दिव्य विजयी जल्लोष मिरवणूक निघणार आहे
जामखेड शहरातील कोठारी पेट्रोल पंप विंचरणा तिरावरील भगवान शंकराच्या मुर्ती पासुन मिरवणूकीस प्रारंभ होणार आहे व समारोप कृषी उत्पन्न बाजार समीती च्या आवारात होणार आसल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे
मिरवणूकीचे वैशिष्ट्य..
या मिरवणूकीत आ. रोहित पवार यांच्यावर अणेक जे. सी. बी च्यामाध्यमातुन पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे तसेच मोठय़ा प्रमाणावर गुलालाची उधळण होणार आहे डि. जे. चा आवाज घुमणार आहे शहरातील खर्डा चौक येथे क्रेनच्या साह्याने आ. रोहित पवार यांना जामखेडकरांच्या वतीने मोठा हार घालून भव्य सत्कार करण्यात येणार आसल्याचे अयोजकांनी सांगितले
विधानसभा निवडणुकीमध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघातील उमेदवार आ. रोहीत (दादा) पवार हे निवडुन आल्यानंतर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला होता. याच अनुषंगाने मंगळवार दि. 3 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता जामखेड शहरातुन भव्य विजयी मिरवणूक रॅली आ. रोहीत दादा पवार मित्र मंडळाच्या वतीने काढण्यात येणार आहे.
याबाबत जामखेड येथे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विजय मिरवणूक रॅली निमित्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व बूथ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंगळवार दि 3 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता विंचरणा नदीवरील शंकराच्या मुर्ती पासुन या विजयी रॅलीस सुरवात होणार आहे. ही रॅली खर्डा चौक, बीड कॉर्नर, बीडरोड मार्गे मार्केटयार्ड येथिल गणपती मंदिर याठिकाणी रॅलीची सांगता होणार आहे. तरी या विजयी रॅलीस जामखेड तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, नागरीक व महीलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ. रोहीत (दादा) पवार मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.