जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी आसे जाती जातीत विष पेरण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते कधी बेरोजगारी, महागाई, शेतीमालाचा भाव व महीला अत्याचारावर कधी बोलत नाहीत. फक्त जात आणि धर्माच्या नावावर राजकारण केले जाते. मी राम शिंदेवर बोलणार नाही कारण माझ्या दृष्टीने राम शिंदे हे प्यादं आहे आपल्याला वजीर पाडायचा आहे. आसा खोचक टोला शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लावला आहे.
महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आमदार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ रविवार दि १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी नान्नज येथे भव्य सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी सुषमा अंधारे या बोलत होत्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते दत्ताभाऊ वारे, सुर्यकांत मोरे, राजेंद्र कोठारी, विजयसिंह गोलेकर, अमोल राळेभात, रमेश आजबे, हनुमंत पाटील, मंगेश आजबे, संपत राळेभात, प्रशांत राळेभात, बाप्पु कार्ले, कैलास वराट, रामहारी गोपाळघरे, संतोष पवार, निखिल घायतडक, श्रीकांत लोखंडे, शरद शिंदे, उमर कुरेशी, मयुर डोके, गणेश काळे, काकासाहेब नेटके, संजय वराट, वैजिनाथ पोले, प्रकाश सदाफुले, काकासाहेब कोल्हे, सौ. अर्चनाताई संपत राळेभात, सौ. राजश्रीताई मोरे, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की फडणवीस यांच्या गृहमंत्री काळात त्यांना एकही आंदोलन हाताळता आले नाही. निरपराध आंदोलकांवर फडणवीस यांनी लाठीहल्ले केले, आंतरवाली सराटी मराठा आंदोलकांवर, बार्सो रिफायनरी आंदोलकांवर, देहू आळंदी वारकऱ्यांवर हल्ला बदलापूर घटना यातील एकही आंदोलन फडणवीस यांना हाताळता आलेले नाही ते नापास गृहमंत्री आहेत. भाजपा म्हणजे भाड्याने जमवलेली पार्टी असा उल्लेख केला. भाजपाने नेते घडविले नाहीत तर दुसऱ्या पार्टीचे नेते चोरले आहेत. आतापर्यंत भाजपा सरकारला लाडकी बहिण का आठवली नाही. निवडणूक समोर ठेवून आणलेली योजना आहे. पण राज्यात बहिण सुरक्षित नाही. भाजपा सरकार म्हणजे गुंडाचे, दलालांचे, एजंटांचे, बदमाशाचे सरकार आहे.
पाशाभाई पटेल बोलले तेव्हा कुठे होती भाजपा महिला आघाडी नक्कीच राम शिंदे व पाशाभाई पटेल यांची काहीतरी वैर असावे त्यांना पराभूत करण्यासाठीच पाशाभाई पटेल आले होते असे वाटते.
आ. रोहित पवार बोलताना म्हणाले की दुष्काळात स्वखर्चातून कर्जत जामखेड तालुक्यात लोकांबरोबर जनावरांना पाणी दिले. सी एस आर फंडातून १४ हजार सायकली वाटप केल्या याचे कारण शिक्षण घेताना विद्यार्थींची पायपीट थांबली पाहिजे. जनतेवर माझा आणि माझा लोकांनवर विश्वास असल्याने मी मतदार संघाबाहेर जाऊन महाराष्ट्रात ३० सभा घेतल्या. मी मतदार संघात नसताना येथे आमच्या कार्यकर्त्यांना फक्त धमकावले जाते. राम शिंदे हे मुकादम आहेत. त्यांचे रात्रीचे प्रवेश होतात. भाजपाचा गमजा बळच कार्यकर्त्यांच्या गळ्यात टाकतात व प्रवेश घडवुन आणला आसे दाखवतात.
आपण अस्तित्वाची लढाई नाही तर विचारांची लढाई लढत आहेत. राम शिंदे साहेब गुंडशाही वाढवु नका मराठी माणुस दिल्ली समोर कधीच झुकत नाही. तुम्ही आम्हाला धमक्या दिल्या तर आम्ही सुद्धा गप्प बसणार नाही. भाजपाचे कटेंगे तो बटेंगे या विधानावर भाजपा नेत्या एकमेव आहेत त्या बोलल्या तसेच फडणवीस म्हणजे फसवणीस आहेत. मराठा, धनगर, अदिवासी समाजाला फसवणारे फडणवीस आहेत. माझी लढाई राम शिंदे बरोबर नाही तर देवेंद्र फडणवीस बरोबर आहे असे रोहित पवार यांनी बोलताना सांगितले.