निवडीनंतर जामखेड शहरात महेश निमोणकर यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन शेकडो वहानांचा ताफा घेऊन नगरयेथील मेळाव्यासाठी रवाना.
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी जामखेड नगरपरिषदेचे मा. उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश निमोणकर यांची निवड करण्यात आली निवडीचे पत्र नगर दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नहाटा यांनी दिले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी गेली आनेक दिवसांपासून रिक्त आसलेल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत जामखेड तालुक्यातील अध्यक्ष पदी कोणाची निवड होते याकडे लक्ष्य लागले होते.
निवड होताच महेश निमोणकर यांचे शेकडो वहानांचा ताफा व हजारो कार्यकर्त्यांसह जामखेड शहरात शक्ती प्रदर्शन,
आज नगर येथे निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याला जाण्यासाठी महेश निमोणकर यांनी जामखेडचे ग्रामदैवत श्रीनागेश्वर याठिकाणहुन वहाणे व कार्यकर्ते घेऊन खर्डा चौक नगर रोड बस स्थानक येथुन नगरकडे रवाना झाले.
यावेळी बोलताना नुतन अध्यक्ष महेश निमोणकर म्हणाले की पक्ष श्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास ठेवून तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे ती सार्थ ठरवुन दाखवणार आहे जामखेड तालुका व शहर विकासासाठी मागील काळातही मी प्रामाणिक प्रयत्न केला व पुढेही करणार आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची विकास कामे करण्याची कार्यपद्धत व झपाट्याने काम करण्याचा त्यांचा स्वभाव यासर्व गोष्टी मनापासून भावल्यामुळे मी त्यांच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ गायवळ व प्रा. सचिनसर गायवळ यांचेही मोलाचे मार्गदर्शन मला वेळोवेळी लाभले आहे या सर्व मान्यवरांच्या सहकार्याने कर्जत जामखेड मतदारसंघाचा भविष्यातील आमदार हा अजितदादा पवार यांच्या विचारांचा आसणारा आहे आसे बोलताना सांगितले.