नक्की कुणाच्या चुकांमुळे! नागरिकांना सहन करावे लागताहेत हाल..

जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातुन जाणारा ऐकमेव राष्ट्रीय महामार्ग म्हणजे जामखेड ते सौताडा गेली आनेक वर्षे या रस्त्याचे काम चालू बंद अशा आवस्थेत आहे या आर्धवट कामामुळे या रस्त्यावर आनेक आपघात होऊन आनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर आनेकांना आपंगत्व पत्कारावे लागले आहे

आता पावसाळ्याचे दिवस आसल्याने या महामार्गावर जामखेड शहरातील खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटल पर्यंत आसलेला महत्त्वाच्या टप्याच्ये काम आर्धवट आवस्थेत आहे मोठमोठे खड्डे निमुळता झालेला रस्ता चिखल गटाराचे पाणीही रस्तावर आसल्याने पदाचारी वहानचालक यांच्यासह ट्राफिक पोलीस सुध्दा हैराण झाले आहेत.

राष्ट्रीय महामार्गाचे आधिकारी, नगर परिषद, का ठेकेदार नेमके कोणाच्या हलगर्जीपनामुळे काम बंद हे कोड काही जामखेडकरांना उलगडेना! आणि यातच कळीचा मुद्दा म्हणजे
शहरातील आतिक्रमण आणि हे का काढले जात नाही यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी का संबंधित विभागांनबरोबर बैठक घेऊन रस्ता मोकळा करून देत नाहीत आसा प्रश्न जामखेडकरांना पडला आहे.

या भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर (आबा) राळेभात यांनी संबंधित ठेकेदारांशी चर्चा केली आसता त्यांनी सांगितले की संबंधित विभागाने आम्हाला रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी आतिक्रमण काढुन रस्ता मोकळा करुन द्यावा तसेच स्टेट लाईट व मेनलाईनचे विजेचे खांब स्थलांतरीत करावे हे झाल्यास आम्ही पुढच्या वीस दिवसात रस्ता तयार करून देत आसल्याचे सांगितले आहे


