सर्व सामान्यांच्या न्याय हक्कासाठी संघटनेच्या माध्यमातून सदैव लढा देणार:गणेश भानवसे

जामखेड प्रतिनिधी
जनशक्ती संघटना महाराष्ट्र राज्यच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी वांगी नं. २ येथील युवा कार्यकर्ते गणेश अभिमान भानवसे यांना देण्यात आली आहे. या बाबत निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी नुकतेच गणेश भानवसे यांना दिले आहे.

शेतकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या, पोलिसांच्या, पाण्याच्या अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर जनशक्ती च्या माध्यमातून अतुल खूपसे पाटील व संघटनेने नेहमीच आवाज उठविला आहे. धडक बेधडक आंदोलन फेम म्हणून त्यांची ओळख असून संघटना वाढीसाठी आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रश्नांवर लढण्यासाठी ते पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर युवक प्रदेशाध्यक्ष पदाची महत्त्वाची जबाबदारी आणि महत्त्वाची धुरा गणेश भानवसे यांच्यावर दिली आहे.

नियुक्तीनंतर बोलताना गणेश भानवसे म्हणाले की, संघटनेच्या ध्येय धोरणानुसार सर्व सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कांसाठी व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांना संघटनेच्या माध्यमातून सहकार्य करण्यासाठी तसेच समाजातील शेतकरी, शैक्षणिक, कला, क्रिडा, सांस्कृतिक, निराधार, अंध, अपंग, उद्योग-व्यवसायिकांचे प्रश्न घेऊन सत्ताधारी असो वा शासन किंवा प्रशासन असो या व्यवस्थेशी दोन हात करण्यासाठी जनशक्तीच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
