ऐकमेकांशी प्रेमाने वागल्याने आपल्या गावाची शांतता आबाधित राहाते : प्रा मधुकर(आबा) राळेभात

- Advertisement -spot_img

जामखेड येथे प्रा. मधुकरआबा राळेभात मित्र मंडळाच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन..

हॅलो अहिल्यानगर जामखेड

जामखेड शहरात दरवर्षी प्रमाणे प्रा. मधुकर आबा राळेभात यांच्या वतीने इप्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते जामखेड शहरात हिंन्दु मुस्लिम ऐक्य आबाधित राखण्याचे कार्य प्रा. मधुकर आबा राळेभात हे करत आहेत त्याच आनुसंघाने या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते

यावेळी बोलताना प्रा. राळेभात म्हणाले की ही इफ्तार पार्टी ठेवण्याचा माझा स्वार्थी हेतू आहे आणि तो म्हणजे मुस्लिम बांधव रमजान महिन्यात आल्लाहाची आराधना करून जे पुण्य कमवतात त्यातला काही वाटा आपल्यालाही मिळावा. रमजान महिन्यात उपवासाच्या माध्यमातून मुस्लिम बांधव जे पुण्य कमवतात त्याला हातभर लागावा यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न आहे. तसेच रमजान हा पवित्र महिना आहे. या महिन्यात प्रत्येक शब्द खरा, नेक आणि सत्य बोलला पाहिजे. त्यामुळे आपले पुण्य वाढत जाते. यामुळे आपल्या जीवनात सुख, समृध्दी येते. माझे गाव, तालुका जिल्हा राज्य व देश शांत असला पाहिजे ही आपली भावना असली पाहिजे. राग हा प्रेमाने संपतो. म्हणून तुम्ही आम्ही प्रेमने एकत्र आले पाहिजे. असे प्रतिपादन जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी केले.


सद्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून दरवर्षी प्रमाणे जामखेड येथील प्रा. मधुकर राळेभात मित्र मंडळाच्या वतीने आज दि. २४ मार्च रोजी सायंकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. जामखेड शहरातील मक्का मस्जिद (कब्रस्तान) येथे पार पडलेल्या इफ्तार पार्टीसाठी तहसिलदार गणेश माळी, पोलीस निरीक्षक महेश पाटील, जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक अमित चिंतामणी,  भाजपा तालुकाध्यक्ष पवन राळेभात, साहित्यिक गोकुळ गायकवाड, मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अजहरभाई काझी,उपाध्यक्ष मंजूर सय्यद, ऍड शमा हाजी कादर,  इस्माईल सय्यद, मुक्तार सय्यद, अबिद खान साहब, इमरान भाई कुरेशी, शेख इस्माईल टेलर, जावेद सय्यद (बारूद), शेरखान भाई, शेख असिफ भाई, उमर कुरेशी, वसीम सय्यद (बिल्डर), शेख जाकीर,  जमीर सय्यद, मास्टर हबीब खान,
विधान परिषदेचे उपसभापती प्रा. राम शिंदे यांचे स्विय साहाय्यक डॉ. अल्ताफ शेख, राहुल उगले. अवधूत पवार,  युवा उद्योजक नागार्जुन राळेभात, भरत राळेभात, अमित जाधव, आकाश बाफना, ॲड. अमृत राळेभात, अर्जुन लोंढे आदींसह विविध पक्षसंघटनांचे पदाधिकारी  व मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजहर काझी म्हणाले की, मधुकर आबा राळेभात हे हिंदू- मुस्लिम समाजाचा एकोपा कायम राहावा यासाठी करत असलेले काम कौतुकास्पद तसेच इतरांनीही प्रेरणा घ्यावे असेच आहे. आता प्रा. मधुकर राळेभात यांचे उत्तरदायी होण्याची वेळ आली आहे.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की,
पवित्र रमजान मधील रोजा मुळे मनाच्या शुध्दतेबरोबरच चांगले आरोग्यही लाभतो. आपल्या भारत देशात सर्व जातीधर्माला सर्वच समान संधी, नागरिकांनी कर्तव्य व कायद्याचे पालन केल्यास सर्वजण गुण्यागोविंदाने राहतील. आपल्या संस्काराची जोड तुटू द्यायची नाही. सर्वांची एकच जात आहे आणि ती म्हणजे मानव जात. जामखेड शहरात शांतता ठेवणे ही सर्वांचीच जबाबदारी
सर्व धर्म चांगले जीवन जगण्याची शिकवण देतात. मधुकर आबा हे नेहमीच जातीय सलोखा व शांतता राखण्याचे काम करता याचा अनुभव आला आहे.सोशल मिडीयाचा चुकिचा वापर करू नये.
सर्वांनी राष्ट्रासाठी काम केले पाहिजे.
यावेळी बोलताना अमित चिंतामणी म्हणाले की, राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन आबा घडवतात, ते करत असलेले कार्य प्रेरणा घेण्यारखे आहे. असे म्हणत त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना माजी ग्रामपंचायत ईस्माईल सय्यद म्हणाले की, प्रा .मधुकर राळेभात यांचे राजकारण विरहित संबंध असून शहरात हिंदू मुस्लीम बंधुत्व कायम राहावे याभावनेतून काम करत असतात. प्रा. मधुकर राळेभात मुस्लिम धर्मीयांच्या सर्व सण उत्साहात सहभाग असतो. ते जामखेड शहरातील मुस्लिम समाजासाठी नेहमीच तत्परतेने काम करतात.
यावेळी  तहसिलदार गणेश माळी, अजहर काझी, ॲड. शमा हाजी कादर, आकाश बाफना, उमर कुरेशी, गोकुळ गायकवाड, यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे मुस्लिम पंच कमीटीच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाकीर शेख यांनी तर आभार पवन राळेभात यांनी मानले.
इफ्तार पार्टीच्या निमित्ताने प्रा.मधुकर राळेभात मित्र मंडळाच्या वतीने सर्वांना अल्पोहराचे वाटप करण्यात आले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा