आ.राम शिंदेंनीही दिली जोरदार लढत..
जामखेड प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या अत्यंत अटीतटीच्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात अखेर रोहित पवार यांना १ लाख २७ हजार ६७६ मते, महायुतीचे आमदार राम शिंदे यांना १ लाख, २६ हजार ४३३ मते मिळाली. अपक्ष रोहित चंद्रकांत पवार यांना ३४८९ मते तर अपक्ष राम नारायण शिंदे यांना ३९२ तर नोटा ला ६०१ मते मिळाली एका ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्यामुळे व्हीव्हीपँट मशीन मधील चिठ्ठ्या मोजणी केली तेंव्हा १२४३ मतांनी रोहित पवार विजयी घोषित करण्यात आले. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी निवडी बद्दल आ. रोहित पवार यांना प्रमाण देण्यात आले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही अनेक अर्थांनी वैशिष्ट्ये पूर्ण आणि अत्यंत चुरशीची ठरली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते उमेदवार रोहित पवार आणि भाजपचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांच्यामध्ये मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत चुरस दिसून आली.
मतमोजणीच्या एकूण यामध्ये २७ फेऱ्या पार पडल्या व अखेरच्या फेरीअखेर चूरशीच्या झालेल्या या लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित पवार यांना एकूण एक लाख २७ हजार ६७६ इतके मताधिक्य मिळून त्यांनी १२४३मतांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांचा पराभव केला.
अटीतटीच्या लढतीत अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कर्जत रोहित पवार कर्जत-जामखेड मधून विजयी
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघांमध्ये मतमोजणीत अखेरच्या क्षणापर्यंत मोठ्या प्रमाणावर चुरस पाहायला मिळाली. अटीतटीच्या झालेल्या या लढतीकडे अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते व अखेर या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे रोहित पवार यांनी तब्बल एक लाख २७ हजार ६७६इतके मते मिळवत दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयश्री खेचून आणली.
त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भारतीय जनता पार्टीचे राम शिंदे यांना एकूण एक लाख २६ हजार ४३३ इतके मते मिळाली व १२४३ मतांनी त्यांचा पराभव झाला. तसेच वंचित बहुजन आघाडीचे सोमनाथ हरिभाऊ भैलुमे यांना एकूण १२५१ इतके मते मिळाली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे करण चव्हाण यांना एकूण ७२० मते मिळाली. या मतदार संघांमध्ये नोटाला एकूण सहाशे एक मतदारांनी पसंती दिल्याचे दिसून आले.