जामखेड तालुक्यातील सातेफळ येथे अल्पवयीन मुलीची आत्महत्या..

- Advertisement -spot_img

खर्डा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करणे, पोस्को, व अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल..

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील सातेफळ येथील एका अल्पवयीन  मुलीचा दोन दिवसांपूर्वी मृतदेह गावाजवळील विहीरीमध्ये आढळून आला होता. पोलीस तपासात सदरची घटना ही प्रेमप्रकरणातुन घडली आसल्याने निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी प्रियकराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, पोस्को व अत्याचाराचा गुन्हा खर्डा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आसुन पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. त्यास न्यायालयाने 21 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की जामखेड तालुक्यातील सातेफळ येथे एका अल्पवयीन मुलीचे गावातील एका मुलासोबत प्रेमप्रकरण सुरु होते. दोघांनाही पळुन जाऊन लग्न करायचे होते. तसे पळुन जाण्याचे देखील ठरले होते. मात्र एक महीन्यापुर्वीच आरोपी सुभाष लक्ष्मण लटके वय 22 वर्षे याने दुसर्‍या मुलीसोबत लग्न केले. तरीदेखील अल्पवयीन मुलगी ही आपण पळुन जाऊ म्हणून आरोपीस फोन करत होती. मात्र अलिकडे आरोपी हा मुलिस भेटण्यास व बोलण्यास टाळाटाळ करत होता. तेंव्हापासून मुलीची मानसिक परीस्थिती खालावली होती. आखेर याच कारणावरुन अल्पवयीन मुलीने काही दिवसापूर्वी गावातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती.

या प्रकरणी सदर मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याचा गुन्हा 13 ऑक्टोबर 2024 रोजी खर्डा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता. तशी फीर्याद मुलीच्या आईने खर्डा पोलीस स्टेशनला दिली होती. यानंतर खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड व पोलीस नाईक संभाजी शेंडे सह पोलीस पथकाने तपासाची चक्रे वेगाने फीरवण्यास सुरवात केली. पोलीस तपास करीत असताना अल्पवयीन मुलीने गावातील एका इसमाच्या मोबाईल वरुन आरोपीस फोन केला आसल्याचे निष्पन्न झाले. तसेच माझ्या जिवाचे बरेवाईट करेल आसे देखील तीने सांगितले होते. यावरुन पोलीसांनी गावातील विहीरीत मुलीचा शोध घेतला असता एका विहिरी जवळ मुलीची चप्पल व ओढणी आढळून आली. यानंतर लगेचच ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल चार तासाने विहीरीतुन सदर मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

यानंतर आरोपी सुभाष लक्ष्मण लटके वय 22 वर्षे रा. सातेफळ यास पोलिसांनी अटक केली. तसेच त्याच्या विरोधात खर्डा पोलीस स्टेशनला पोस्को, अत्याचार व आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत पोष्टमार्टमचा अंतिम रोपोर्ट आल्यावरच नेमके मृत्यू कशामुळे झाला हे उघड होणार आहे. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड व पोलीस नाईक संभाजी शेंडे हे करीत आहेत.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा