स्त्री भ्रूण हत्या रोकने ही काळाची गरज: डॉक्टर सुनील बोराडे.
जामखेड प्रतिनिधी

दिनांक आठ मार्च 2025 रोजी जामखेड महाविद्यालय येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी श्रीमती जयश्रीताई देशमुख अध्यक्षस्थानी होत्या. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते व अतिथी डॉक्टर सुनील बोराडे तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती जामखेड उपस्थित होते.

स्त्रियांची प्रगती विविध क्षेत्रात झाली असली तरी सगळीकडे स्त्रियांवरती अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे. समाजामधील मुलींचे जन्माला येण्याचे प्रमाण कमी झालेले आहे व ते समाज व्यवस्थेसाठी घातक आहे. त्याकरिता स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध कायदा 2003 नुसार शासकीय यंत्रणांनी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे व समाजातील सर्व घटकांनी याबाबत जनजागरण करून सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. तसेच 2030 सालापर्यंत बालविवाहाचे प्रमाण देखील 0 पर्यंत आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. स्त्रियांमधील वाढलेले कॅन्सरचे प्रमाण चिंताजनक असल्याचे मत डॉक्टर सुनील बोराडे यांनी व्यक्त केले. प्राचार्य डॉक्टर डोंगरे एम एल यांनी तरुणीं च्या जबाबदार लैंगिक वर्तनाबाबत भाष्य केले.
दि पीपल्स एज्युकेशन सोसायटी जामखेड च्या संचालिका श्रीमती नलिनीताई कुलकर्णी यांनी तरुण मुलींनी शिकण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले. डीपी पण एज्युकेशन सोसायटीच्या दुसऱ्या संचालिका श्रीमती संगीता ताई देशमुख यांनी एकत्र कुटुंब पद्धती बाबत व त्याची जडणघडण व्यवस्थित ठेवली पाहिजे असे मत व्यक्त केले. कुमारी किंबहुने अक्षता, कुमारी पवार भारती व कुमारी शिंदे निकिता या महाविद्यालयीन तरुणींनी ऐतिहासिक स्त्रियांचा वारसा सांगितला व आपली मनोगते व्यक्त केली.

सूत्रसंचालन प्राध्यापक राहुल कांबळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर गायकवाड अश्विनी यांनी केले. कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका व इतर कर्मचारी उपस्थित होते.
दिनांक आठ मार्च 2025 रोजी जामखेड महाविद्यालय येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी श्रीमती जयश्रीताई देशमुख अध्यक्षस्थानी होत्या. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते व अतिथी डॉक्टर सुनील बोराडे तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती जामखेड उपस्थित होते. स्त्रियांची प्रगती विविध क्षेत्रात झाली असली तरी सगळीकडे स्त्रियांवरती अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे. समाजामधील मुलींचे जन्माला येण्याचे प्रमाण कमी झालेले आहे व ते समाज व्यवस्थेसाठी घातक आहे. त्याकरिता स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध कायदा 2003 नुसार शासकीय यंत्रणांनी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे व समाजातील सर्व घटकांनी याबाबत जनजागरण करून सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. तसेच 2030 सालापर्यंत बालविवाहाचे प्रमाण देखील 0 पर्यंत आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. स्त्रियांमधील वाढलेले कॅन्सरचे प्रमाण चिंताजनक असल्याचे मत डॉक्टर सुनील बोराडे यांनी व्यक्त केले. प्राचार्य डॉक्टर डोंगरे एम एल यांनी तरुणीं च्या जबाबदार लैंगिक वर्तनाबाबत भाष्य केले. दि पीपल्स एज्युकेशन सोसायटी जामखेड च्या संचालिका श्रीमती नलिनीताई कुलकर्णी यांनी तरुण मुलींनी शिकण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले. डीपी पण एज्युकेशन सोसायटीच्या दुसऱ्या संचालिका श्रीमती संगीता ताई देशमुख यांनी एकत्र कुटुंब पद्धती बाबत व त्याची जडणघडण व्यवस्थित ठेवली पाहिजे असे मत व्यक्त केले. कुमारी किंबहुने अक्षता, कुमारी पवार भारती व कुमारी शिंदे निकिता या महाविद्यालयीन तरुणींनी ऐतिहासिक स्त्रियांचा वारसा सांगितला व आपली मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन प्राध्यापक राहुल कांबळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर गायकवाड अश्विनी यांनी केले. कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका व इतर कर्मचारी उपस्थित होते.