ऐतिहासिक खर्ड्याच्या कानिफनाथाचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात सुरू..

- Advertisement -spot_img

कानिफनाथांचा अश्व व मानाच्या काठ्यांची यात्रा उत्सवात आहे परंपरा

जामखेड प्रतिनिधी

खर्डा येथील कानिफनाथ यात्रा सर्वधर्मसमभावाची ज्वलंत प्रतीक,होळीच्या दिवशी सर्वधर्मसमभावाचा सोहळा.
जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा गावात होळीच्या दिवशी कानिफनाथ यात्रा उत्सवास सुरवात दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहास सुरवात झाली

ग्रामदैवत श्री कानिफनाथ यात्रा सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. राज्यातील मुंबई, पुणे, नगर येथून मोठ्या संख्येने भाविक खर्डा येथे येऊन यात्रेची शोभा वाढवतात. यात्रेच्या आदल्या दिवशी कंदुरी केली जाते आणि संध्याकाळी कानिफनाथ यांचे वाहन आश्व गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. भाविक संदल पाहण्यासाठी मोठी गर्दी करत असतात.

खर्डा कानिफनाथ यात्रा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे उंच टेकडीवर नाथाच्या मानाच्या काठ्या ४० ते ५० फूट उंचीच्या नाचवल्या जातात. वाजत गाजत गावातील नागरिकांच्या हस्ते त्या दुपारी चार वाजता शिखरावर पोहोचविल्या जातात. हा क्षण अंगावर शहारे आणणारा असतो. त्यानंतर यात्रेत जाऊन लोक आनंद घेतात. खेळणी वाले, पाळणा वाले, इत्यादी दुकानात मित्र परिवार, नातेवाईक यात्रेचा मनसोक्त आनंद घेतात.

खर्डा गावचे श्री. कानिफनाथ ग्रामदैवत असून हिंदू, मुस्लिम व सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन कनिफनाथाचे मनोभावे दर्शन घेतात.

कानिफनाथ यात्रा ही सर्वधर्मसमभावाची प्रतीक म्हणून ओळखली जाते. यात्रेतील एकत्रितपणा आणि आनंदाचे वातावरण हे या यात्रेचे वैशिष्ट्य आहे. या यात्रेमुळे समाजातील एकता आणि सौहार्द वाढते.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा