कुसडगाव ते पैठण दिंडी सोहळ्याचे ठिक ठिकाणी स्वागत! गेली पंधरा वर्षांपासून सुरू आहे हा सोहळा..

- Advertisement -spot_img

ह. भ. प. राजाभाऊ महाराज जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सरपंच पप्पु (अंकुश) कात्रजकर यांच्या नियोजनाने दिंडी सोहळ्याचे आयोजन .

जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथुन गेली पंधरा वर्षांपासून ह. भ. प. राजाभाऊ महाराज जमदाडे यांच्या नेतृत्वाखाली कुसडगाव ते पैठण दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते
    या दिंडीचे ठिकाणी भाविक भक्त मोठ्या उत्साहात स्वागत होते नाथ शेष्ठीसाठी राज्यभरातुन दिंड्या पैठणला जातात त्याच  भक्तीभावाने कुसडगाव येथील विठ्ठल मंदिरातुन दि. १४/३/२०२५ रोजी दिंडीचे प्रस्थान झाले कुसडगाव ग्रामस्थ व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते


दि. १९ /३/२०२५ रोजी दिंडी पैठण नगरित पोहचणार आहे दिंडीचा पैठण येथील मुक्कामाचे ठिकाण कवसान स्टेडियम गावडेश्वर मंदिराच्या पाठिमागे आहे.
    या दिंडीसाठी आनेक दानशूर दात्यांची मदत लाभते शोकडो भाविक हारीनामाच्या जयघोषात उन्हाची तम्हा न बाळगता दिंडीत सहभागी होतात
   यावेळी बोलताना दिंडीचे चालक राजाभाऊ महाराज जमदाडे म्हणाले विठ्ठलभक्त संत एकनाथ महाराज यांनी समाजाच्या उध्दारासाठी भक्ती मार्ग दाखवला
त्याच वाटेवर आज समाज मार्ग क्रमण करून परमात्म्याच्या प्राप्तीसाठी भक्ती करत आहे

पैठण क्षेत्रात संत एकनाथ महाराजांच्या घरी देवाने पाणी भरले अशी आख्यायिका आहे
एकनाथी भागवतातुन सर्व सामान्यांना कळेल अशा भाषेत भागवत ग्रंथाचे रूपांतर केले तसेच वारकऱ्यांच्या नित्यनेमात संत एकनाथ महाजांचा हरिपाठाचे फार महत्व आहे
आणि हाच भक्ती भाव मनात घेऊन लाखो वारकरी नाथशेष्ठीला पैठण येथे येतात आसे महाराजांनी सांगितले..

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा