मराठी नविन वर्षाच्या शुभमुहूर्तावर संत वामनभाऊ गड जमदारवाडी येथे “लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा “

- Advertisement -spot_img

रामायण ग्रंथातील युध्द कांड श्रवणाचा श्रोत्यांना घेता येणार आहे आनंद..

जामखेड प्रतिनिधी
संत वामनभाऊ महाराज गड जमादारवाडी येथे आज सायंकाळी सात वाजे पासुन उद्या सकाळी आठ वाजे पर्यंत लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे
संत वामनभाऊ महाराज गड जमदारवाडी येथे सतत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते


     रामायण ग्रंथातील युध्द कांडामध्ये लक्ष्मण शक्तीचे वर्णन पहावयास मिळते प्रभु श्रीराम व रावण यांच्यात घनघोर आसे युध्द सुरू होते निती विरूद्ध अनिती धर्म विरूद्ध अधर्म आसे युध्द सुरू आसताना रावणाणे भगवान ब्रम्हाची आराधना करून बम्हशक्ती मिळविली होती परंतु ती आवतारी पुरूषांकरिता फारशी बाधक नव्हती तरीही या युध्दात लक्ष्मणाला शक्ती लागली व ते मृच्छित झाले
     त्यावर सुशान वैद्यांनी सांगितले की संजीवनी औषधीने लक्ष्मण जागृत होतील आणि यासाठी हानुमंतानी द्रोणागिरी पर्वत आणला व त्यावरील संजीवनी औषधीने लक्ष्मण वाचले आसा प्रसंग युध्द कांडामध्ये आहे


     पुर्वीच्या कालखंडात प्रत्येक गावागावात रामायण महाभारत हरिविजय नवनाथ ग्रंथाचे वाचन केले जायचे गावातील सर्वाजनीक ठिकाणी वाचक ग्रंथ वाचत आसत तर सुचक त्या ग्रंथाचा अर्थ सांगत आसत आणि सर्व गाव एकत्र येत श्रवण करत होता व लक्ष्मण शक्ती काही महिने वनवास आसे उत्सव साजरे केले जात होते आणि यासाठी रामायणाचे गाढे अभ्यासक दिवंगत ह. भ. प. तुळशीराम मुळे, नरहरी आजबे,भाऊराव राळेभात, कचरू नेटके अशा दिवंगत माणसांचे मोठे योगदान राहिले आहे

परंतु काळच्या ओघात मनोरंजनाचे आनेक साधने उपलब्ध झाल्याने अशा धार्मिक गोष्टी
कालबाह्य होत चालल्या आसताना संत वामनभाऊ गड येथील भाविक भक्तांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरू केला आणि याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे
यासाठी ह. भ. प. राजाभाऊ देवा कुलकर्णी
ह. भ. प. सातपुते महाराज, कैलास नेटके यांच्यासह आदि मंडळींनी पुढाकार घेतला आहे
      या आनुशंगाने संत वामनभाऊ मंदिर परिसरात आकर्षक आशी विधुत रोषणाई करण्यात आली आहे या कार्यक्रमासाठी राज्य भरातुन वाचक सुचकांची उपस्थिती राहणार आहे तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनसाठी ग्रंथ श्रवनाची पर्वणी आहे त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा व उद्या सकाळी महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा