रामनवमी व हनुमान जयंती उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन..

- Advertisement -spot_img

जामखेड शहरातील तपनेश्वररोड येथील हनुमान मंदिर ट्रस्टच्यावतीने केले आयोजन..

जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथील तपनेश्वररोड येथील हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने
श्री रामनवमी ते हनुमान जयंती उत्सवानिमित्त दासबोध पारायण रामजप व किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन रविवार दि. ६ एप्रिल रोजी जामखेडचे तहसिलदार गणेश माळी व मान्यवरांचे उपस्थितीत विनापुजनाने या सोहळ्याची सुरूवात होणार असून दि. १३ एप्रिल रोजी हभप ॲड. पांडुरंग महाराज लोमटे यांचे काल्याचे किर्तनाने या सोहळ्याची सांगता होणार आहे. तरी या सोहळ्यादरम्यान होणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


जामखेड येथील हनुमान मंदिर, तपनेश्वर येथे सालाबादाप्रमाणे श्री रामनवमी ते हनुमान जयंती सप्ताह होत आहे. रविवार दि. ०६/०४/२०२५ ते रविवार दि. १३/०४/२०२५ दरम्यान होणाऱ्या सोहळ्याची सुरूवात तहसिलदार गणेश माळी, मंडळाधिकारी माने व तलाठी विश्वजीत चौगले यांच्या हस्ते विनापुजन करून होणार आहे.


सोहळ्यादरम्यान रविवार दि. १३ एप्रिल रोजी सकाळी ७.०० वा.
कलश पुजन, नियमितपणे दररोज पहाटे ५ ते ६ काकडा, सकाळी ७ ते १० दासबोध पारायण, १० ते १२ गाथा भजन २.३० ते ४.३० महिला भजन, ५ ते ६ हरिपाठ रात्री ७ ते ९ किर्तन व नंतर महापंगत नंतर हरिजागर असे दैनंदिन कार्यक्रम होतील यानंतर दि. ६ एप्रिल ह.भ.प. कैलास महाराज भोरे (देवदैठण), ह.भ.प. बाबा महाराज ढवळे (हाळगाव), दि. ७ एप्रिल ह.भ.प. विजय महाराज बागडे सर (पुणे), दि. ८ एप्रिल ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पवने (जामखेड), दि. ९ एप्रिल ह.भ.प. अशोक महाराज भाकरे (पाटोदा ग.), दि. १० एप्रिल ह.भ.प. राजेंद्र महाराज झेंडे (मोहा),
दि. ११ एप्रिल ह.भ.प. लखन महाराज पवार (हिवरवाडी), दि. १२ एप्रिल ह.भ.प. डॉ. अमित महाराज डोके (मातकुळी) यांची किर्तन तर दि. १२ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सवानिमित्त सकाळी ०५.०० ते ६.०० संगीत भजन व दुपारी ०४.०० ते ०६.०० दिंडी मिरवणुक सोहळा होईल. व दि. १३ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ ह.भ.प. अॅड. पांडुरंग महाराज लोमटे (सेशन कोर्टधाराशिव) यांचे काल्याचे किर्तन, दहिहंडी व महाप्रसाद वाटपाने सोहळ्याची सांगता होईल. तरी श्री रामनवमी ते हनुमान जयंती उत्सवानिमित्त दासबोध पारायण रामजप व किर्तन सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

चौकट
सर्व भाविकांनी सोहळयात सहभागी व्हावे व मंदिराचे नवीन जागेचे खरेदी व बांधकाम पुर्ण करण्यासाठी तन, मन, धनाने सहकार्य करावे व श्रवण सुखाचा लाभ घ्यावा असेही आवाहन हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा