खर्डा येथील विशाल सुर्वे खुन प्रकरणात एकास जन्मठेपेची शिक्षा..

- Advertisement -spot_img

जामखेड प्रतिनिधी

आडीच वर्षांपूर्वी खर्डा येथील विशाल सुर्वे खुन प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या तीन आरोपींन पैकी एकास श्रीगोंदा येथील जिल्हा व अति सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी जन्मठेपेची शिक्षा व १३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली तर मयताच्या पत्नीसह दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आपला नवरा प्रियकराच्या अनैतिक संबंधाला अडथळा ठरत आसल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने आडीच वर्षापूर्वी आपल्या नवर्‍याचा खुन केला होता.

काय होते नेमके प्रकरण…..

याबाबत अधिक माहिती अशी की मयत विशाल ईश्वर सुर्वे (वय २६, रा. सुर्वे वस्ती, खर्डा ता. जामखेड) हा दि १३ मे २०२२ रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आपल्या घराकडे चालला होता. यावेळी मयत विशालच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. यानंतर तात्कालिन पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तपासाची चक्रे फीरवत गुन्ह्यातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी विविध शोध पथके तयार करण्यात आली होती. त्या नुसार तपास करत आसताना मयताची पत्नी व त्यांच्या नात्यातील आरोपी कृष्णा संजय सुर्वै या दोघांचे अनैतिक संबंध होते. मात्र या अनैतिक संबंधाला मयत विशाल सुर्वे हा अडथळा ठरत होता. त्यामुळे त्याचा काटा काढण्यासाठी आरोपीची पत्नी  हीने कट रचला होता. मयत विशाल सुर्वे हा त्या दिवशी काम आटोपून आपल्या घरी येत असताना विशाल ची पत्नी ही मोबाईलच्या माध्यमातून पतीच्या संपर्कात होती. मयत विशाल हा आपली रीक्षा घेऊन येत आसताना तो त्यांच्या खर्डा येथील सुर्वे वस्तीकडे जात आसताना लक्ष्मीआई मंदिराजवळ गाडी आली यावेळी आरोपी कृष्णा सुर्वे रा. सुर्वे वस्ती, खर्डा व त्याचा मित्र श्रीधर राम कन्हेरकर वय २७ रा. खर्डा शिवार याच्या मदतीने विशाल याच्या डोक्यावर टणक वस्तूने मारहाण केली होती. या मारहाणीत विशाल याचा जाग्यावरच मुत्यू झाला होता.

याप्रकरणी आरोपी कृष्णा संजय सुर्वे वय १९, श्रीधर रामा कन्हेकर, वय २७ व मयत विशाल याची पत्नी आशा तिघांना पोलिसांनी अटक केली होती. सदरच्या आरोपींन विरोधात आडीच वर्षांपासून न्यायालयात खटला सुरू होता. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण एकवीस साक्षीदार तपासण्यात आले. त्यातील काही साक्षीदार फुटीर झाले. परंतु फिर्यादी सुशांत सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, पंच सुरेश पवार, प्रकाश गोलेकर, गोरख शिकारे, सुरेश हजारे, पवन सोनवणे, श्रीराम कुलकर्णी, हनुमंत औटी, योगेश वाळुंजकर, डॉ. संजय वाघ, साक्षीदार राजेंद्र भुमकर, तपास अधिकारी तत्कालीन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, जामखेड पोलीस स्टेशन यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण, परिस्थितीजन्य व ग्राह्य धरण्यात आल्या. सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेल्या साक्षीदारांनी दिलेले पुरावे, दाखल कागदपत्रे आणि परिस्थितीजन्य पुरावे हे आरोपी विरुद्ध गुन्हा शाबित करण्याकामी सबळ व पुरेशी असल्याने तसेच आरोपीने केलेला खून निघृण स्वरूपाचा असल्याने व आरोपींविरुद्ध गुन्हा शाबीत झाल्याने आरोपी यास मयत विशाल सुर्वे याला जीवे ठार मारल्या प्रकरणी व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ व २०१ नुसार दोषी धरून आरोपीस जन्मठेप व रु.  १३ हजार दंडाची शिक्षा दिली आहे. 

सदर प्रकरणात आरोपीतर्फे घेण्यात आलेले बचावाचे मुद्दे न्यायालयाने ग्राह्य धरले नाहीत. सदर प्रकरण चालविणेकामी सरकार पक्षास पोलीस निरीक्षक तसेच प्रभारी जामखेड पोलीस ठाणे श्री महेश पाटील यांनी सदर गुन्ह्यातील साक्षीदार यांना वेळोवेळी मार्गदर्शन  केले आहेत तसेच पोहेकॉ पैरवी. संजय लाटे, पो.कॉ. सचिन पिरगळ, पो. कॉ. नामदेव रोहाकले, व ऍड. सुमित पाटील यांनी मदत केली.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा