शिस्तबद्ध आणि शांततेत आंबेडकर जयंती साजरी करण्याचा – पोलीस निरीक्षकांचा संदेश

जामखेड | प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत व शिस्तबद्धरीत्या पार पाडण्यासाठी जामखेड पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक झाली. शहरातील विविध सामाजिक संघटना, भिमसैनिक, पोलीस प्रशासन व नगरपरिषद अधिकारी उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी मिरवणुकीत केवळ डॉ. आंबेडकर यांचेच फोटो लावावेत, सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट्स टाळाव्यात, असे स्पष्ट केले. प्रा. मधुकर राळेभात यांनी प्रतिमा पूजन सकाळी १० पूर्वीच करण्याचा सल्ला दिला. ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी महापुरुषांच्या विचारांना गालबोट लागू नये यासाठी समाजाने एकत्र यावे, असे सांगितले.

प्राचार्य विकी घायतडक यांनी मिरवणूक शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले. संध्या सोनवणे यांनी सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन आदर्श जयंती साजरी करावी, असे म्हटले. सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी डिजेचा आवाज नियंत्रित ठेवावा, लेझर लाईट्स टाळाव्यात व महिलांच्या सुरक्षेची दक्षता घ्यावी, असे सांगितले.

या बैठकीस जेष्ठ नेते प्रा.मधुकर राळेभात, ॲड डॉ अरुण जाधव, प्रदीप टापरे,दिगांबर चव्हाण,मोहन पवार,प्राचार्य विकी घायतडक, बापूसाहेब गायकवाड,संध्या सोनवणे,आतिश पारवे,काका राळेभात,पवन राळेभात,आनंद सदाफुले,राणा सदाफुले,दिपक सदाफुले,विकी गायकवाड, मच्छिंद्र जाधव,मनिष घायतडक,आकिब आतार,आतिष मेघडंबर, राम गायकवाड आदी भिमसैनिक तसेच नगरपरिषदेचे आरोग्य विभागाचे तुषार केवडे,लिपिक लक्ष्मण माने उपस्थित होते.
या बैठकीचे नियोजन पोलीस नाईक अविनाश ढेरे यांनी केले.