सामाजिक न्याय विभागाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्काराचे वितरण.

- Advertisement -spot_img

जिल्हा संपर्क अधिकारी मधुकर महानुर यांची उपस्थिती

जामखेड प्रतिनिधी

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्काराचे वितरण मुंबई येथे विविध मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

यावेळी जिल्ह्यातील पुरस्कारार्थींना सोबत घेऊन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अहिल्यानगर यांच्या वतीने
जिल्हा संपर्क अधिकारी मधुकर महानुर हे उपस्थित होते. जिल्ह्यातील तीघांना हा पुरस्कार देण्यात आला

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील
सुभाष गायकवाड यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार, श्रीगोंदा येथील बापू कसबे यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पाथर्डी येथील कडुबाबा लोंढे यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार देण्यात आला. मुंबई येथे पुरस्कार वितरणाच्या वेळी जिल्हा संपर्क अधिकारी म्हणून मधुकर महानुर डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह जामखेड हे उपस्थित होते.

सामाजिक न्याय विभागाचे वतीने सन 2023.24 डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण व आण्णा भाऊ साठे पुरस्कार अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील लोंढे कडुबाबा, श्रीगोंदा येथील बापू कसबे व श्रिरामपुर येथील गायकवाड सुभाष यांना मुख्यमंत्री महोदय मा देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट साहेब जलसंधारण मंत्री संजय राठोड पर्यावरण मंत्री भरत शेठ गोगावले साहेब व आमदार संजय बाऺगर याचं हस्ते सन्मान मिळाला आहे.

दि 10.6.2024 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे मिळालं आहे सामाजिक न्याय विभागाचे वतीने अहिल्या नगर जिल्ह्यातील संपर्क अधिकारी म्हणून महानुर मधुकर हे पुरस्कार व्यक्ती सोबत होते ह्या सर्व मा विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे साहेब, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा