जामखेड शहरात वारंवार दुकाने फोडीच्या घटना, व्यापारी वर्गात भितीचे वातावरण..

जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील खरेदी विक्री संघाच्या गळ्यातील श्रीनाथ शुमार्ट दुकानात दि. 9 च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानातील बुट चप्पल साहित्यासह रोख रक्कम लंपास केली आहे. दुकानातील सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास झाला आहे. यामुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत आण्णासाहेब मारूती उगले वय 36 धंदा-चप्पल दुकान यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या तक्रारी म्हटले आहे की माझे जामखेड शहरात अहील्यानगर रोड खरेदी विक्री संघ गाळा नं. 05 येथे माझे श्रीनाथ शुमार्ट नावाचे दुकान असुन ते दुकान चालवुन मी माझे कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. सदरचे दुकान सकाळी 09.00 वा. सुमारास चालु करून रात्री 08.00 वा. चे सुमारास दुकान व्यवस्थीत बंद करुन घरी जात असतो. दि.09.06.2025 रोजी सकाळी 09.00 वा चे सुमारास मी माझे अहील्यानगर रोड खरेदी विक्री संघ गाळा नं.05 जामखेड ता. जामखेड येथील श्रीनाथ शुमार्ट नावाचे दुकानावर आलो होतो, दिवसभर दुकानावर काम करून रात्री 08.00 वा चे सुमारास दुकान व्यवस्थीत बंद करुन नायगाव ता. जामखेड येथे माझे घरी गेलो होतो.

आज दि.10.06.2025 रोजी सकाळी 08.00 वा चे सुमारास भी नायगाव ता. जामखेड येथे घरी असताना मला माझे दुकानाचे शेजारील दुकानदार संतोष नवलाखा यांनी फोन करुन सांगितले की, तुझे दुकानाचे शटर कोणीतरी उचकटलेले दिसत आहे तरी तु ताबडतोब ये असा फोन आल्याने मी माझा भाउ गोकुळ उगले असे
आम्ही ताबडतोब माझे दुकाना जवळ आलो असता आमचे दुकानाचे शटर कशाचे तरी सहयाने तोडलेले दिसले.

त्यांनतर आम्ही दुकानात जावुन पाहीले असता दुकानातील साहीत्य अस्थावेस्त पडलेले दिसले त्यांनतर मी व भाऊ गाकुळ उगले, मामा शिवाजी वीर, तसेच नारायण राळेभात, संतोष नवलाखा असे आम्ही दुकानातील साहीत्याची पाहणी केली असता दुकानातील विक्री साठी आनलेल्या चप्पल, बुट, सॅण्डल मिळुन आले नाहीत म्हणुन आमची खात्री झाली की, कोणीतरी अज्ञात चोरट्याने माझे संमती शिवाय लबाडीचे इरादाने स्वतःचे अर्थिक फायदेकरीता
माझे दुकानातील सामानाची चोरी केली आहे.

दुकानातील चोरीस गेलेल्या साहीत्याचे च रोख रक्कम याचे वर्णन खालील प्रमाणे
24,000/- रुपये किंमतीचे न्यु लुक कंपनीचे बुटाचे 80 नग 12) 60,000 /- रुपये किंमतीचे एस. एन. कंपनीचे बुटाचे 75 नग
24,000/- रुपये किंमतीचे हायटेक कंपनीचे सॅण्डल चे 60 नग
39,000/- रुपये किंमतीचे कॅम्पस कंपनीचे बुटाचे 30 नग
21,000/-रुपये किं चे एक्सरेट कंपनीचे सॅण्डल चे 70 नग
33,000/- रुपये किंमतीचे एअर गोल्ड कंपनीचे चप्पल चे 95 नग
21,250 रुपये किंमतीचे इंण्डस कंपनीचे चप्पलचे 85 नग
19,800 रुपये किमतीचे एसपीएस कंपनीचे चप्पलचे 90 नग
13000/- रुपये किंमतीचे स्लाईस कंपनीचे चप्पलचे 65 नग
40,000/- रुपये रोख त्यात 500/- रुपये 80 नोटा
2,95,050/- एकुण


